Nagpur News : नागपूरशहरातूनएकमनविषन्नकरणाराप्रकारसमोरआलाआहे. ज्यामध्ये अपघातात मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झालाआहे. अपघातानंतर (Accident) मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेतघरगाठलंय. परिणामी माणुसकीला लाज आणणारा याघटनेचाव्हिडीओआतासमोरआलाअसूनसमाजमाध्यमांवरहाव्हिडीओ व्हायरल होतोय. हिघटनाशहरातीलनागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली असल्याचेसांगितलंजातंय. तरदुसरीकडेयाव्हिडीओवरनेटकऱ्यांनी हळहळ व्यक्तकेलीआहे.
भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा जागीचदुर्दैवी मृत्यू
पुढेआलेल्यामाहितीनुसार, ग्यारसी अमित यादव अस मृतक महिलेचे नाव आहे. तर अमित यादव असे पतीचे नाव आहे. देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात काल (10ऑगस्ट ) दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास मागून वेगात आलेल्या ट्रकने कट लागल्याने पत्नीपडून ट्रकच्या चाकाखाली आली. यात पत्नीचा जागीचदुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला असतानामदतीसाठी कोणीही वाहन थांबवायाला तयार नव्हतं, अथवाकुणीहीमाणुसकीदाखवायला तयार झालं नाही. यावेळी हतबल पती अमित यादवने डोळ्यांतून अश्रू पुसत हात जोडून वाहनांना थांबविण्याचा ही प्रयत्न केला. मात्रत्यातत्यांनायशआलंनाही.
पती मदतीची याचना करत राहिला, अखेर पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधला अन्...
परिणामी, अखेरचापर्यायम्हणूनपतीने पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी मध्यप्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. पती-पत्नी हे माध्यप्रदेशच्या सिवनी येथील रहिवासी आहे. ते मागील 10 वर्षापासून पती अमित भुरा यादव (35) याच्यासोबत कोराडी नजीकच्या लोणारा येथे राहत होते. रक्षाबंधन असल्याने अमित मोटारसायकलने लोणारा येथून देवलापारमार्गे करणपूरला जात होता. सुरुवातीला मदतीची याचना करत कोणतही वाहन थांबले नाही, मात्र मृतदेह घेऊन जाताना अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, नंतर मात्र भीतीने तो थांबायला तयार नव्हता. महामार्ग पोलिसांनी त्याला अडवून ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला.
ही बातमी वाचा:
