Nagpur Accident : नागपूरमधील रिक्षा अपघातात माय लेकाचा दुर्दैवी अंत झालाय. रिक्षाची दुभाजकाला घडक बसली आणि पलटी झाला. यातच खासगी कार्यक्रमावरुन येत असलेल्या माय-लेकाने जीव गमावलाय. ही घटना आज (दि.27) नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आटो चालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. 

खासगी कार्यक्रमावरुन येत असाताना रिक्षाची डिव्हायडरला धडक बसली

अधिकची माहिती अशी की, एका खासगी कार्यक्रमावरुन येत असाताना रिक्षाची डिव्हायडरला धडक बसली. या अपघातात माय-लेकाचा मृत्यू झालाय.  हिंगणा-वाडी बायपासवर मध्यरात्री 12 वाजता प्लास्टो कंपनी समोर आटो चालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे एक खाजगी कार्यक्रम आटोपून घरी जात असताना ही घटना घडली आहे. ऑटोवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ऑटो आधी दुभाजकावर आदळला व उलटला यात चालक रोहित व मागच्या प्रवासी सीटवर बसलेली त्याची आई करुणा दोघांनाही डोक्यावर व हातापायाला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बाळापुरजवळील भीकुंड नदीच्या पुलावरुन खासगी बस कोसळली 

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील बाळापूरनजीक लक्झरी बस पुलावरून खाली कोसळलीय. भिकूंड  नदीच्या पुलावर हा अपघात घडलाय. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडलीय. बसमधील सर्व प्रवासी हे वाशिम येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहेय. बसमधील प्रवासी हे अयोध्येवरून परत येत होतेय. बाळापुरजवळील भीकुंड नदीच्या पुलावर या खासगी बसचा ब्रेक न लागल्याने सदर बस ही पुलावरून नदीत कोसळलीय. या घटनेत कुठलीच जीवित हानी झाली नसून 50 प्रवासी सुखरूप आहेयेत. यात काहींना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती प्राप्त होत आहेय. घटनेची माहिती मिळताच बाळापुर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात नेण्याचे कार्य सुरू होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Beed : धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी सुरेश धसांनी सुपारी घेतली, 'त्या' सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या: बीड प्रकरणावर अमोल मिटकरी काय म्हणाले? 

Beed Crime : बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका