Mumbai Tajmahal Hotel Threat Call : मुंबई शहरातूनएकअतिशयखळबळजनकआणिमोठीबातमीसमोरआलीआहे. मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने (Mumbai Bomb Threat) उडवूनदेण्याची धमकी आलीआहे. मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी रविवारी मध्यरात्री नियंत्रण कक्षाला मिळाल्याचीमाहितीआहे. दरम्यान, हीमाहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (Mumbai Police) तात्काळ तपासाची चक्र फिरवत ताज हॉटेल गाठतअधिकतपाससुरुकेलाआहे.

Continues below advertisement

मिळलेल्यामाहितीनुसार, नवी मुंबई पोलीस कंट्रोलला रात्री 12.13 वाजता एका व्यक्तीने फोन करून, “दाऊदने (Dawood Ibrahim) ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे,” अशी माहिती दिली. त्यानंतर ही माहिती मुंबई मुख्य नियंत्रण कक्षाला देण्यात आली. माहिती मिळताच कुलाबा पोलीस, गुन्हे प्रकटीकरण पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तातडीने ताज हॉटेलमध्ये दाखल झाले. हॉटेलमधील मेन लॉबी, स्विमिंग पूल, विविध हॉल, रेस्टॉरंट, पार्किंग, बाहेरील परिसर तसेच इतर संवेदनशील ठिकाणांची घातपातविरोधी तपासणी करण्यात आली.

Mumbai Bomb Threat Call : धमकीचा फोन तुर्भे परिसरातून करण्यात आल्याचे निष्पन्न

Continues below advertisement

मात्र, तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळून आले नाही. सध्या तांत्रिक तपासात धमकीचा फोन तुर्भे परिसरातून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या क्रमांकाच्या आधारे संशयिताचा शोध पोलिसांनी सुरू केला असून तुर्भे पोलीस ठाण्याच्या मदतीने कॉल करणाऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्याचे काम सुरू आहे. मात्रयानिनावीधमकीच्याफोनमुळेसर्वत्रखळबळउडालीअसूनयातीलआरोपीलाशोधूनकाढणं पोलीसांपुढेआव्हानअसणारआहे.

Mumbai Police : परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलीनाही, धमकी अफवा, पोलिसांचीमाहिती

दरम्यान, संपूर्ण परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी ही धमकी अफवा असल्याचे जाहीर केले. 2008 मधील भीषण 26/11 दहशतवादी हल्ल्यांचे ठिकाण राहिलेले 'ताज हॉटेल' हे मुंबईतील सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. त्यामुळे या हॉटेलला मिळणारी कोणतीही धमकी ही कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांसाठी त्वरित आणि गंभीर चिंतेची बाब ठरते. अशातच, तांत्रिक तपासणीदरम्यान हा फोन नवी मुंबईतील तुर्भे भागातून आल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी धमकीचा फोन करण्यासाठी वापरलेला मोबाईल क्रमांक शोधून काढला असून, फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी व त्याला अटक करण्यासाठी ते तुर्भे पोलिसांच्या मदतीने कार्यवाही करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या