Mumbai Local Train Accident:मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर मंगळवारी एका तरुणाचा चालत्या लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. साईराज बेणारे (पु./वय-27 वर्षे, राहणार:- आर.जी.एस. इंग्लिश शाळेजवळ, उल्हासनगर) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मुंब्रा रेल्वे पुलाजवळ (Mumbra Railway bridge) सकाळी 6 वाजून 10 मिनिटाच्या सुमारास हा अपघात घडला. ट्रेनमधून (Local Train) खाडीत पडल्यानंतर साईराज तेथील एका लोखंडी रॉडला अडकला होता. यानंतर तो खाली खाडीच्या (Mumbra Creek) पात्रात पडला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वे पोलीस आणि मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केला आहे. (Maharashtra Accident news)

Continues below advertisement

साईराज बेणारे ट्रेनमधून खाली पडल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचा एक जवान,रेस्क्यू वाहनासह व रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेसह अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी साईराज बेणारे याचा मृतदेह खाडी पात्रातून बाहेर काढून मुंब्रा पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला.  यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा या ठिकाणी पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आला. साईराज बेणारे सकाळी सहाच्या सुमारास ट्रेनमधून खाली पडला, त्यावेळी फारशी गर्दी नसते. मग तो ट्रेनमधून कसा खाली पडला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. साईराज बेणारे स्वत:च्या चुकीमुळे ट्रेनमधून खाली पडला की अन्य कोणते कारण होते, याचाही शोध रेल्वे पोलिसांकडून घेतला जात आहे.

Parbhani Train Accident: परभणीत रुळावर मरुन पडलेल्या व्यक्तीच्या अंगावरुन एक्स्प्रेस ट्रेन गेल्याने वाद

Continues below advertisement

परभणीत रेल्वे रुळावर मरुन पडलेल्या एका व्यक्तीच्या अंगावरुन एक्स्प्रेस ट्रेन नेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचा व्हिडिओ शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर टाकला व अपुऱ्या पोलीस बळामुळे हा प्रकार झाल्याचे सांगितले आहे. गणेश बालाजी नावाचा 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह पूर्णा नदीवरील पुलावर असलेल्या रेल्वे रुळावर पडलेला होता. त्याचे धड आणि डोके वेगळे झाले होते. याबाबत लोको पायलट यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. याच दरम्यान एक दुसरी रेल्वे या रुळावरून जात होती. काही स्थानिक तरुण हातात लाल कापड घेऊन ती रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे थांबली नाही  आणि गणेश बालाजी यांच्या मृतदेहावरुन पुढे गेली.

इतर बातम्या

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळमध्ये भीषण अपघात; मावळ-तळेगावच्या 4 तरुणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?