मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Satara News : सातारा जिल्ह्यातील पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचं उघड झाल्यानं मुंबई गुन्हे शाखेनं एका आरोपीला अटक केली आहे.

सातारा: मुंबईतील एका व्यावसायिकाला धमक्या दिल्याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन या ३९ वर्षीय व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत आरोपीचे पाकिस्तानमधील प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा'शी थेट संबंध असल्याचे उघड झाले आहेत. आरोपीचा भाऊ याच संघटनेत कमांडर आहे. आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी हँडलरशी संपर्क साधून धमक्या दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल व एक डायरी जप्त केली असून, या रॅकेटमधील अन्य सहकाऱ्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
लष्कर-ए-तोयबाशी संबंध असलेल्या संशयिताला पाचगणीतून अटक
मुंबई क्राईम ब्रँचकडून 39 वर्षीय मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन याला अटक केली आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी कारवाई मुंबई गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे पाकिस्तानातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी थेट संबंध असल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे.
आरोपीचा भाऊ लष्कर-ए-तोयबामध्ये कमांडर असल्याची माहिती समोर आली आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. पाकिस्तानी हँडलरशी संपर्क साधून व्यावसायिकाला धमकी दिल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी आरोपीकडून दोन मोबाईल आणि एक डायरी जप्त केली आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा क्राईम ब्रँचकडून शोध सुरू आहे.





















