Mumbai Crime News :मुंबईच्या कांदिवली (Kandivali Crime News) सामता नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलाआहे. आरोपी अल्पवयीन मुलीचा प्रियकरानी क्राइम पेट्रोल पाहून हत्या केल्याचेतपासातसमोरआलंआहे. आरोपीने मुलीला अनोख गिफ्ट देण्याचा नावाने मुलीचं डोळे बंद केले आणि त्यानंतर चाकूने तिच्या गळा कापून हत्या (Kandivali Crime) केल्याचेसमोरआलंआहे. क्राइम पेट्रोल बघून हत्या केल्यानंतर पुरावा कसा नष्ट केला जातो, ते पाहून त्या आधारे आरोपीने पुरावा देखील नष्ट केलाय.
दरम्यान, दीड वर्षांपूर्वी गणपती मंडळात गणपती दर्शन घेण्यासाठी आरोपी गेला असता त्या ठिकाणी अल्पवयीन मुलीची ओळख झाली होती. यानंतर अल्पवयीन मुलगी आणि आरोपी प्रियकर यांच्यामध्ये मागील दीड वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. तर आरोपी मुलीला लग्न करण्यासाठी प्रेशर टाकत असल्यामुळे मुलीकडून नाकार देण्यात आला. यानंतर आरोपीने मुलीची हत्या करण्यासाठी क्राइम पेट्रोल पाहून कट रचल्याचेसमोरआलंआहे. (Kandivali Crime News)
Mumbai Crime News : गिफ्ट देण्याचा नावाने डोळे बंद करायला लावले, अन्.....
दरम्यान, याप्रकरणी कांदिवली दामू नगर परिसरातील जंगलामध्ये आरोपी प्रियकराने मुलीला भेटण्यासाठी बोलावलं होतं. यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला अनोखा गिफ्ट देण्याचा नावाने डोळे बंद करायला लावले. मुलीनी डोळा बंद करताच आरोपींने चाकू घेऊन मुलीचं गळा कापून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह जंगलात फेकून दिला. मात्र वन विभागाचे कर्मचारी जंगलात पेट्रोलिंग करताना अनोळखी मृतदेह दिसल्याची माहिती समता नगर पोलिसांना दिली. समता नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. यानंतर समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा ओळख पटवण्यासाठी अवघ्या एक ते दीड तासांमध्ये हरवलेला मुलींची शोध घेऊ मृतदेहाची ओळख पटवली. मुलीच्या हत्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी आरोपी सूरज वाघमारे (22) याला अटक केली आहे. अटक आरोपी हा कांदिवली पूर्व येथील रहिवासी आहे. प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वादातून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपी समता नगर पोलिसांच्या ताब्यात असून समता नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
