Mumbai: राज्याच्या राजधानीत मुंबईतील पवईमध्ये एका व्यक्तीने 15 वर्षाखालील 17 मुला -मुलींना एका खोलीत ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे . गेल्या 5 दिवसांपासून या भागात 'तारक मेहता का उल्टा चश्मा ' या मालिकेत काम करण्यासाठी मुंबईत ऑडिशन चालू असल्याने ही मुले येथे येत होती . (Mumbai hostage news) मात्र, आज सर्व मुलांना ओलीस ठेवून त्यानंतर किडनॅपर रोहित आर्य याने व्हिडिओने माहिती दिली . घटनेची माहिती मिळताच पोलीस NSG कमांडो घटनास्थळी पोहोचले . पोलिसांनी बाथरूममधून एन्ट्री करत एका व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांची सुखरूप सुटका केली .यावेळी एकूण 17 मुले एक वयस्कर आणि एक स्थानिक असे 19 लोक आतमध्ये होते .
रोहित आर्यने सकाळी सर्व ऑडिशन घेतली, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक मागवलं, नंतर रोहित आर्याने मुलांच्या डोक्यावर बंदुक ठेवत खरे रंग दाखवायला सुरुवात केली. दरम्यान, रोहित आर्या मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र, पवई पोलिसांनी वेळीच हालचाल केल्याने मोठा अनर्थ टाळलाय.
मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा आणि कोल्ड्रिंक मागवले
शाळेमधून मुलांना ऑडिशन देण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आली होती. कोल्हापूरमधून सुद्धा मुलं ऑडिशन देण्यासाठी आली होती. या सर्व मुलांची रोहित आर्याने सकाळी ऑडिशन घेतली. यानंतर लहान मुलांना खुश करण्यासाठी रोहित आर्याने पिझ्झा आणि कोल्ड्रिंकसोबत इतर खाण्याच्या वस्तू मागवल्या. ऑडिशन झाल्यानंतर त्याने सर्व मुलांना बंधक बनवण्यास सुरुवात केली. लहान मुलांच्या डोक्यावर बंदूक ठेवून कोणी बोलू नका, नाही तर गोळी मारेन अशी धमकी आरोपी रोहित आर्या देत राहिला. छऱ्याच्या बंदुकीने लहान मुलांना बंदी बनवणाऱ्या रोहित आर्या मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र, पवई पोलिसांनी वेळीच हालचाल केल्याने मोठा अनर्थ टाळलाय. रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला फायर करत पोलिसांनी मुलांची सुटका केली.
सध्या शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या कोर्सेसला किंवा इतर अॅक्टीव्हीसाठी गुंतवून ठेवत आहेत. त्यातच, मुंबईच्या पवई येथील RA स्टुडिओत काही शाळकरी मुले गेल्या 4-5 दिवसांपासून प्रशिक्षणसाठी येत होती. मात्र, ऑडिशनच्या नावाखाली येथील स्टुडिओत किडनॅपरने शाळकरी मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली.
पोलिसांच्या गोळीने आरोपी रोहित आर्याचा मृत्यू
पवई स्टुडिओ ऑडिशन किडनॅपिंग केस प्रकरणातील आरोपी रोहित आर्या याने पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी क्रॉस गोळीबार करत एक राउंडही फायर केला होता. या गोळीबारात आरोपी रोहित आर्या जखमी झाला, उपचारादरम्यान आरोपी रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
नेमका प्रकार काय?
पवईच्या महावीर क्लासिक बिल्डिंगमील RA स्टूडिओमध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून सिनेमा, वेब सीरीजसाठी कास्टिंग केले जात होते. त्यासाठी, 17 जणांचे फाइनल कास्टिंग झाले. त्यामुळेच, येथील स्टुडिओत आज 17 मुले आणि दोन पालक उपस्थित होते. दुपारी जेवणाच्या वेळेत ही मुले स्टुडिओतून बाहेर गेल्यानंतर पालक चिंतेत होते. कारण, ही मुले काचेतून आपला हात दाखवत इशारा करत होती. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आल्यानंतरच हा किडनॅपिंगचा प्रकार असल्याचे उघडकीस आले.