Mumbai Drugs Crime Case : मुंबईतील गोरेगाव नेस्को संकुलातील (Goregaon Nesco Centre Drugs case) लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगाव (Goregaon Crime) पूर्वेकडील नेस्को संकुलात ही धक्कादायक घटना घडली असूनयाप्रकरणाच्यातपासातआताधक्कादायकमाहितीसमोरआलीआहे. नेस्को, गोरेगाव येथील पार्टीत ड्रग्सचा उघडपणे वापर करण्यातआलाअसून प्राथमिक माहितीनुसार या कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थी हे नशेत असल्याचीमाहितीआहे. दरम्यान, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर यंत्रणांची झोप उडाली असूनयाप्रकरणाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भोंगळ कारभार उघड झालाआहे.

Continues below advertisement

दरम्यान, या पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाची परवानगी होती की नव्हती? हा तपास सध्या सुरू आहे. वनराई पोलीस ठाण्याकडूनयाप्रकरणाचाअधिकवेगानेतपाससुरुआहे. तरयातपासातूनआणखीन अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

Goregaon Crime: नेस्कोसारख्या हाय-प्रोफाइल ठिकाणी हे ड्रग्स पोहोचले कसे? दोन आरोपी अटकेत

Continues below advertisement

दुसरीकडे, गोरेगाव नेस्को सेंटर पार्टी प्रकरणी अटक करण्यातआलेले दोन आरोपी आनंद पटेल आणि प्रतीक पांडे हे दोघे मित्र असल्याचीमाहितीआहे. तसेचहे दोघे कल्याणमध्ये राहायला असल्याचीमाहितीआहे. आनंद पटेल हा ड्रग्स सप्लाय करतो, तर प्रतीक पांडे यांनी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये पार्टी करण्यासाठी आनंद पटेलकडून ड्रग्स विकत घेतलंअसल्याचीमाहितीसमोरआलीआहे. मात्र, आता आनंद पटेल याचंम्हणणंआहेकिमी ड्रग्स आशिष नावाच्या व्यक्तीकडून घेतलंहोतं. दरम्यान, आनंद पटेल आणित्याच्यावडिलांवर 19 गुन्हे दाखल असल्याचीहीमाहिती आहे.

Goregaon Crime: सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह, मोठ्या रॅकेटचा संशय

दरम्यान, याप्रकरणाचावेगानेपोलीसतपासकरतअसताना नेस्कोसारख्या हाय-प्रोफाइल ठिकाणी हे ड्रग्स पोहोचले कसे? हा मोठा सवाल आतायानिमित्यानेविचारलाजातोय. दुसरीकडे सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थितकेलेजातआहे. कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू असताना परवानग्या कशा दिल्या? यामुळे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर देखील गंभीर शंका उपस्थितकेलीजातआहे. दरम्यान या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्तकेलाजातअसूनया प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढणार असल्याचीशक्यताआहे.

इतर महत्वाच्या बातम्या