ED Officers Extortion: मुंबईशहरातूनएकमोठीआणिखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. 2.25 कोटींच्या खंडणीप्रकरणी (ED Officers Extortion Case) जयपूर EDच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा (Jaipur ED Officials) दाखलकरण्यातआलाआहे. जयपूर EDचे अधिकारी मोहित गर्ग आणि देवेंद्रकुमार गुप्ता यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. मालाड पश्चिमेतील व्यावसायिकाकडून 2.25 कोटींची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यातआलाआहे. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास क्राईम ब्रँचकडे वर्ग केला असल्याचीमाहितीआहे. दरम्यान, 20 जुलै रोजी दोन्ही अधिकारी व्यावसायिकाच्या कार्यालयात गेल्याचा FIRमध्ये उल्लेख असून मनी लॉन्ड्रिंगच्या पैशांशी संबंध असल्याचा आरोप करत चौकशी केल्याचा दावा करण्यातआलाआहे.

Continues below advertisement

ED Officers Extortion:  सुरुवातीला 5 कोटींची मागणी, नंतर 2.25 कोटींची खंडणी उकळल्याचा आरोप

दरम्यान, EDकडे सर्च आणि जप्तीचे अधिकार असल्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यातआलाअसून सुरुवातीला 5 कोटींची मागणी करण्यातआली, आणि नंतर ती 2.25 कोटींवर आणल्याचा आरोप करण्यातआलाआहे. तर दबावाखाली 1 कोटी रोख दिल्याचा तक्रारदाराचा दावा आहे. तसेच 25 जुलै रोजी दिल्लीमध्ये सहकाऱ्यांमार्फत आणखी 1.25 कोटी दिल्याचा आरोप करत प्रकरण बंद झाल्याचे दाखवणारी कागदपत्रे दाखवण्यात आल्याचा दावा देखीलकरण्यातआलाआहे. मात्र कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. शिवाय दरमहा संरक्षणाच्या नावाखाली पैसे मागितल्याचाही आरोप यामध्येकरण्यातआलाआहे. परिणामीयाप्रकरणी BNS कलम 308(2), 351(2) आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यातआलाअसूनपोलीसया प्रकरणाचाअधिकतपासकरतआहे. तर याप्रकरणी PMLA अंतर्गतही केस आणि झाडाझडती करण्यात आल्याचीही माहिती आहे.

Continues below advertisement

Mumbai News: परवानगीशिवाय WhatsApp ग्रुप बनवला; TISS प्राध्यापकाला सक्तीची निवृत्ती, हायकोर्टाकडून आदेश रद्द

TISSचे प्राध्यापक डॉ. स्वपन गराई यांना सक्तीने निवृत्त करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. परवानगीशिवाय WhatsApp ग्रुप तयार करणे ही नोकरी संपवण्याइतकी गंभीर बाब नसल्याचे हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलंआहे. न्या. एम. एस. कर्णिक आणि न्या. संदीप पाटील यांच्या खंडपीठाने 16 सप्टेंबर रोजी यासंदर्भात निर्णय दिलाय. सक्तीच्या निवृत्तीची शिक्षा विसंगत आणि अत्यंत असमानुपातिक असल्याचे कोर्टाचे निरीक्षण आहे. तर डॉ. गराई यांनी 'TISSians Career Impact2 नावाचा WhatsApp ग्रुप तयार केला होता. TISSच्या लोगोचा परवानगीशिवाय वापर केल्याचा आणि वैयक्तिक फायद्यासाठी समांतर प्लेसमेंट सेवा चालवल्याचा संस्थेचा आरोप होता. मात्र, प्लेसमेंटसाठी पैसे घेतल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे हायकोर्टाने नमूद केले आहे. WhatsApp चॅट्समध्ये सदस्यांकडून नोकरीच्या संधी आणि उपयुक्त माहिती शेअर होत असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आले असता 2016 मध्ये डॉ. गराई यांना निलंबित करण्यात आले होते, तर 2017 मध्ये सक्तीने निवृत्त करण्यात आले. मात्र, वयाच्या 65 वर्षांपर्यंत सेवेत राहण्याचा हक्क असताना वयाच्या 58व्या वर्षी निवृत्त केल्याचे त्यांचे म्हणणे होते. 'नट फोडण्यासाठी हातोड्याचा वापर करता येत नाही' या न्यायिक तत्त्वाचा दाखला देत कोर्टाने शिक्षेच्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित केला. परिणामी हायकोर्टाने सेवेत सुपरअॅन्युएशनपर्यंत सातत्य देण्याचे निर्देश दिले आहे.

इतरमहत्वाच्याबातम्या