मुंबई : 'डिजिटल अरेस्ट'च्या (Digital Arrest) नावाखाली नागरिकांना भीती दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांच्या पश्चिम विभाग सायबर गुन्हे शाखेने (West Region Cyber Police) पर्दाफाश केला आहे. देशातील विविध राज्यांत एकाच वेळी विशेष मोहिमेअंतर्गत धाडी टाकत पोलिसांनी या टोळीतील 7 सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने एका नागरिकाला 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून 1 कोटी 67 लाख 40 हजार रुपयांचा मोठा गंडा घातला होता.

Continues below advertisement

Digital Arrest Modus Operandi : कशी करायचे फसवणूक?

आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधून त्यांच्या आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्डचा (PAN Card) वापर एका मोठ्या मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering) गुन्ह्यात झाल्याचा बनाव रचला. तुमच्या बँक खात्यांची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे आणि तुमच्या विरोधात सुप्रीम कोर्टातून (Supreme Court) अटक वॉरंट निघाले आहे, अशी भीती त्यांना घालण्यात आली.

अटक आणि कायदेशीर कारवाईच्या दहशतीखाली आरोपींनी फिर्यादीला तब्बल 1 कोटी 67 लाख रुपये त्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने मुंबई सायबर पोलिसांत धाव घेतली.

Continues below advertisement

Digital Arrest Raids Arrests : विविध राज्यांत एकाच वेळी धाडी

गुन्हा दाखल होताच मुंबई सायबर गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे देशातील विविध राज्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी करत 7 आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:1. संजय शाह2. ऋषी रामचंद्र मीना3. नौशाद अली4. मोहम्मद खालीद सैफी5. जगेश्वर महतो6. जाबीर हुसेन7. एक महिला आरोपी

न्यायालयाने सर्व आरोपींना सध्या पोलीस कोठडी सुनावली आहे.

Seized Electronic Gadgets : 27 मोबाईल, 613 सिमकार्ड जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोठे साहित्य जप्त करण्यात आले आहे:

विद्युतीय उपकरणे : 27 मोबाईल, 2 लॅपटॉप, 5 डिजिटल सही साधने (Digital Signature Tools).

बँकिंग आणि सिम : 613 सिमकार्ड, 10 चेकबुक, 2 पासबुक आणि 2 एटीएम कार्ड.

गोठवलेली रक्कम : आरोपींच्या विविध बँक खात्यांमधील 34 लाख रुपये पोलिसांनी तातडीने गोठवले (Freeze) आहेत.

या आरोपींनी अशाच प्रकारे 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून देशात आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? याचा सखोल तपास मुंबई पोलीस करत आहेत.

ही बातमी वाचा: