Mumbai Crime : सहा पिस्टल आणि 67 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना अटक, मुंबई खंडणी विरोधी पथकाची कारवाई
Mumbai Police News : जप्त करण्यात आलेली शस्त्रे ही कुणाला विकण्यात येणार होती आणि त्याचा वापर कशासाठी करण्यात येणार होता याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.

मुंबई : प्राणघातक अग्निशस्त्र विक्री करण्याच्या उद्देशाने ते जवळ बाळगणाऱ्या तीन आरोपींना मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकांने अटक केली आहे. पायधुनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 2 पिस्टल,1 रिव्हॉलवर,3 गावठी कट्टे आणि 67 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पायधुनी परिसरात प्रभू हॉटेल जवळ 3 व्यक्ती बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंबई खंडणी विरोधी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकांने सापळा रचून 3 आरोपींना अटक केली आहे.
अटक आरोपींकडून पोलिसांना 2 पिस्टल, 1 रिव्हॉल्व्हर, 3 गावठी बनावटीचे कट्ट्यांसोबत 67 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अभिषेक कुमार पटेल (वय 26 वर्षे), सिद्धार्थ सुभोध कुमार गोलू (वय 23 वर्षे) आणि रचित रमशिषकुमार मंडळ (वय 27 वर्षे) अशी अटक आरोपींची नावं आहेत.
या सर्व आरोपींच्या विरोधात पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आरोपींनी कुठून हा अग्निशस्त्राचा साठा आणला होता, मुंबई शहरात कोणाला विकणार होते, त्यांचे टार्गेट कोण होते या संदर्भात अधिक तपास मुंबई पोलिसांचे खंडणी विरोधी पथक करत आहे.
लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींची छेडछाड
भांडुपमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेत पुन्हा एक 'बदलापूर' (Badlapur) सारखीच घटना उजेडात आली आहे. यात लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींची छेडछाड केल्याची घटना घडली आहे. शाळेत योगासन शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विद्यार्थीनीनी या बाबत माहिती दिल्याने प्रकार उजेडात आला आणि त्यानंतर पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील नामांकित शाळेत 'बदलापूर'सारखी घटना
मिळालेल्या माहितीनुसार 27 नोव्हेंबरच्या सकाळी 10 ते 1.30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. यात शाळेच्या बेसमेंटमध्ये 10 वर्षीय एक तर 11 वर्षीय दोन विद्यार्थीनी योगा करत होत्या. दरम्यान शाळेतील लिफ्टची सफाई आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून या चिमुकलींची छेडछाड करण्यात आली. त्यानंतर घडलेल्या या प्रकाराची तक्रार विद्यार्थीनीनी योगा शिकणाऱ्या शिक्षिकेसह आपल्या कुटुंबीयांकडे केली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता बेसमेंटमध्ये असलेले सीसीटीव्हीची तपासणी केली असता या संपूर्ण प्रकरणाची सत्यता उजेडात आली. धक्कादायक बाब म्हणजे, लिफ्ट ग्राऊंड फ्लोवरवर संपते. मात्र लिफ्टची सफाई आणि देखभाल करणाऱ्या कर्मचारी बेसमेंटमध्ये पडद्याच्यामागे लपल्याचे आढळून आला.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
