Mumbai Crime News: मुंबईतील (Mumbai) वडाळा (Wadala) पूर्व भागातून एक मन हेलावून टाकणारी आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्या लग्नाला सतत विरोध करणाऱ्या अवघ्या 20 वर्षांच्या पोटच्या मुलीचा बापानेच गळा आवळून काटा काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण वडाळा परिसर हादरून गेला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Continues below advertisement

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना वडाळा पूर्वेतील मेडॉना कॉलनी परिसरात घडली आहे. रिफत शरीफ खान (वय 20) असे मृत तरुणीचे नाव आहे. आरोपी वडील शरीफ रझा हुसेन खान (वय 45) याला दुसरं लग्न करायचं होतं. मात्र, त्याची 20 वर्षांची मुलगी रिफत हिचा या दुसऱ्या लग्नाला तीव्र विरोध होता. याच कारणावरून आरोपी बाप आणि मुलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. आपल्या लग्नात मुलगी अडथळा ठरत असल्याचा राग आरोपीच्या मनात खदखदत होता.

Mumbai Crime News: घरात कुणी नसताना आवळला गळा

दरम्यान, घरात कुणीही नसताना या संधीचा गैरफायदा घेत आरोपी शरीफ खान याने रागाच्या भरात रिफत हिचा गळा दाबून तिला संपवले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच वडाळा पोलिसांनी (Wadala Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत रिफतच्या गळ्याभोवती गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) पाठवण्यात आला आहे. 

Continues below advertisement

Mumbai Crime News: आरोपी पोलिसांच्या कचाट्यात

याप्रकरणी वडाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी बाप शरीफ रझा हुसेन खान याला तात्काळ अटक (Arrest) केली आहे. मुलीची हत्या नेमकी कशी आणि कोणत्या वेळेत केली, तसेच यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, या दिशेने पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Andheri Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर तीन वर्षे अत्याचार, शिंदे गटाचा युवा नेता शिवम दुबे उर्फ 'चोंग्या'ला अंधेरीत बेड्या

Nida Khan: 8 महिन्यांची गर्भवती निदा खानसमोर नवं संकट; गंभीर गुन्ह्यांत जामीन मिळाला, पण आता पतीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली