Mumbai Crime News: मुंबई (Mumbai) शहरातील विलेपार्ले पश्चिम (Vile Parle West) परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनोजकुमार अयोध्या यादव (वय 35) यांचा मृतदेह इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीत (Water Tank) आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून पोलीस (Police) विविध अंगांनी तपास करत आहेत.

Continues below advertisement

विलेपार्ले पश्चिम येथील अभिजीत बिल्डिंग, एस. व्ही. रोड येथे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने प्रथम मनोजकुमार यादव यांचा गळा आवळला. त्यानंतर त्यांचे दोन्ही हात कपड्याच्या दोरीने मागे बांधण्यात आले. यानंतर मृतदेह इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याने भरलेल्या टाकीत टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. एवढेच नव्हे, तर पाण्याच्या टाकीचे लोखंडी झाकण बंद करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Mumbai Crime News: पोलिसांकडून तपास सुरु 

घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेचे (Crime Branch) अधिकारी यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध दिशांनी तपास करत आहेत. इमारतीतील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात असून, घटनेच्या आधी आणि नंतर परिसरात वावरणाऱ्या संशयितांची माहिती गोळा केली जात आहे. तसेच मृताच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची चौकशीही सुरू आहे.

Continues below advertisement

या घटनेमागील नेमका हेतू काय होता, आरोपीची ओळख कोण आहे आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे विलेपार्ले परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Thane Bhiwandi Accident : काल फ्लॅट बघायला जाताना दुचाकी खड्ड्यात गेली, महिला थेट ट्रकच्या चाकाखाली, आज TDRF चा जवानाचं डिव्हायडरवर डोकं आपटलं, भिवंडीत खड्ड्यांचे बळी

Devendra Fadnavis : मुंबई महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांकडून इनोव्हा गाड्यांच्या खरेदीसाठी पैशांची उधळपट्टी, देवेंद्र फडणवीस नाराज, भाजपच्या सभागृह नेत्यांनी मांडलेला प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की