धक्कादायक! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरले, आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या गोरेगाव पूर्वमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mumbai Crime News : मुंबईच्या गोरेगाव पूर्वमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानेच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिंडोशी पोलिसांनी आरोपी प्रियंशू गुप्ता याला अटक केली आहे. त्याच्या प्रेयसीलाही आरोपी करण्यात आले आहे.
आरोपीने आईचे दागिने विकून गर्लफ्रेंडसोबत वाढदिवसाची पार्टी आणि ड्रग्सवर पैसे उडवल्याची कबुली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आईचे दागिने विकून गर्लफ्रेंडसोबत वाढदिवसाची पार्टी आणि ड्रग्सवर पैसे उडवल्याची कबुली दिली आहे. साधारण 3 लाख 32 हजार रुपयांच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी 33 ग्रॅम सोने आणि 22 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत. चोरीतील जवळपास 88 टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून दागिने खरेदी करणाऱ्यांचाही तपास सुरू आहे. दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या:
ATM मधून 63 लाखांची चोरी, कांदिवली पोलिसांनी मोठी कारवाई, 6 तासातच दोन आरोपींना अटक
Before You Go
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या






















