Mumbai Crime News :  मुंबईतील भायखळा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. भायखळा परिसरात काही वेळापूर्वी गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. समीर शेख असं जखमी झालेल्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

भायखळा पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल

भायखळा परिसरात काही वेळापूर्वी गोळीबाराची घटना घडली असून, समीर नावाच्या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारीत समीर यांच्या पायाला गोळी लागली असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर कोण होते आणि गोळीबारामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर भायखळा पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मांडीला गोळी लागल्याने आसिफ दाढीचा मुलगा समीर शेख जखमी 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.  डोक्यार्ड रोड परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. मांडीला गोळी लागल्याने आसिफ दाढीचा मुलगा समीर शेख जखमी झाला आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.  समीर शेखला जे जे रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. भायखळा पोलीस घटनास्थळी दाखल झआले आहेत. दरम्यान, गोळीबाराच कारण अद्याप अस्पष्ट हे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार केला आहे.  गोळीबार करून दोघेही हल्लेखोर पसार झाले आहेत.

Continues below advertisement

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना, अज्ञात लोकांकडून तरुणाला बेदम मारहाण

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कॅम्प क्रमांक 5 मधील भगवानदास हॉस्पिटलजवळ  रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका तरुणाला काही अज्ञात युवकांनी अडवत “तुला रोडवरुन चालता येत नाही का? असा सवाल करत वाद घालण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच हाणामारीत बदलला. आरोपींनी संबंधित तरुणाला रस्त्यातच बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये आरोपी तरुणाला मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. घटनेनंतर जखमी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.