Mumbai Crime : मुंबईच्या मालाड पूर्वेत पोलिसांनी मोठी कारवाई; अवैधरित्या भारतात दाखल चार बांगलादेशी नागरिकांना पुराव्यानिशी अटक
Mumbai Crime News : मुंबईच्या मालाड पूर्वेत कुरार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात मालाड पठाणवाडी परिसरातून चार बांगलादेशी (Bangladesh) नागरिकांना अटक करण्यात पोलिसांना (Mumbai Police) यश आलं आहे.

Mumbai Crime News : मुंबईच्या मालाड (Malad) पूर्वेत कुरार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात मालाड पठाणवाडी परिसरातून चार बांगलादेशी (Bangladesh) नागरिकांना अटक करण्यात पोलिसांना (Mumbai Police) यश आलं आहे. हे चारही बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरित्या (Crime News) दाखल होऊन मुंबईच्या मालाड पठाणवाडी परिसरात काम शोधण्यासाठी आले होते.
Mumbai Crime News : मालाड पठाणवाडी परिसरातून चार बांगलादेशी नागरिकांना अटक
दरम्यान, मालाड कुरार पोलिसांच्या ATC पथकाला त्यांच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक काम शोधण्यासाठी येत असल्याचं गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या अनुशंगाने कुरार पोलिसांच्या एटीसी पथकाने मालाड पठाणवाडी परिसरात धाडी टाकून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांचे नाव तुहीनुर जायनल सरदार (वय 30 वर्षे), मोहम्मद अब्दुल मोमीन लतीफ सरदार (वय 52 वर्षे), नजरुल इस्लाम स्वर अली बिश्वास (वय 41 वर्षे), मोहम्मद इमामुल हक्क रहेमान (वय 46 वर्षे) असून हे सर्व आरोपी बांगलादेश मधले राहणारे आहेत
Crime News : बांगलादेशी नागरिक असल्याचा पुरावे जप्त, आणखी काही लोकं अवैधरित्या भारतात दाखल झालेत?
कुरार पोलिसांनी या आरोपीकडून बांगलादेशी नागरिक असल्याचा मोठा प्रमाणात पुरावे सुद्धा जप्त केली आहेत. या आरोपी सोबत आणखी काही लोकं अवैधरित्या भारतात दाखल झाले आहेत का? त्यासोबत मुंबई शहरात या आरोपींना कोण मदत करत होता? या संदर्भात अधिक तपास कुरार पोलिसांकडून सुरू आहे त्यासोबत अटक करण्यात आलेले हे सर्व बांगलादेशी नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्यासाठी (Deport) कुरार पोलिसांकडून तयारी देखील सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा
























