एक्स्प्लोर

Mumbai Crime News: मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवून नको नको ते करायला सांगायचा; सुनील पवारला अटक, मुंबईतील हादरवणारी घटना

Mumbai Crime News: मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mumbai Crime News मुंबई: मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव सुनील शंकर पवार आहे, तो 47 वर्षांचा आहे आणि कांदिवली पश्चिम येथील रहिवासी आहे. (Mumbai Crime News)

नेमकं काय घडलं? (Mumbai Crime News)

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एका आरोपीला अटक केली आहे जो अल्पवयीन मुलींचा पाठलाग करायचा आणि नंतर त्यांना पॉर्न चित्रपट दाखवायचा आणि नंतर त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यास सांगायचा. आरोपीने मालाडमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत असेच काहीसे केले, परंतु मुलीने संपूर्ण घटना तिच्या वडिलांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी प्रथम गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीने यापूर्वी सुद्धा कुठल्या मुलीसोबत अशी घटना केली आहे का? या संदर्भात मालाड पोलीस पुढील तपास करत आहे.

मुंबईतील आणखी एक धक्कादायक घटना समोर- (Mumbai Local Train Crime News)

लोकल ट्रेनमध्ये झालेल्या किरकोळ वादाचा फटका थेट एका निरपराध प्रवाशाला बसल्याची धक्कादायक घटना वांद्रे रेल्वे स्थानकात (Bandra railway station) घडली आहे. दोन प्रवाशांमधील भांडण इतके टोकाला गेले की, त्यातील एकाने रेल्वे ट्रॅकवर उतरून धावत्या ट्रेनच्या दिशेने दगड भिरकावला. मात्र हा दगड भांडणात नसलेल्या तिसऱ्याच प्रवाशाच्या डोळ्याला लागल्याने त्याला गंभीर इजा झाली आहे. या घटनेत अकाउंटंट असलेल्या निशांत खत्री यांना डोळ्याला जबर दुखापत झाली असून, डॉक्टरांनी संबंधित डोळा यापुढे काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका क्षणाच्या रागातून झालेल्या या कृतीमुळे एका निष्पाप व्यक्तीचे आयुष्य कायमचे बदलले आहे. ही घटना वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात घडली असून, घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:

संबंधित बातमी:

Mumbai Crime News: दोघांच्या भांडणाचा तिसऱ्या प्रवाशाला फटका, एकाने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावला अन् अकाऊंटंटचा डोळा गेला; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
Baby Selling Case: छत्तीसगडमधील अल्पवयीन मुलीचे तरूणासोबत प्रेमसंबंध; डिलिव्हरी आली, डॉक्टरनं हेरलं अन् पैशांची मागणी, बाळविक्री प्रकरणातील डॉक्टरचा आणखी एक कारनामा आला समोर
छत्तीसगडमधील अल्पवयीन मुलीचे तरूणासोबत प्रेमसंबंध; डिलिव्हरी आली, डॉक्टरनं हेरलं अन् पैशांची मागणी, बाळविक्री प्रकरणातील डॉक्टरचा आणखी एक कारनामा आला समोर
Beed Crime : बायको नांदायला येईना, दारुच्या नशेत पतीने थेट सासर्‍याचं घरच पेटवलं; बीडच्या पिंपळा धायगुडा येथील घटना
बायको नांदायला येईना, दारुच्या नशेत पतीने थेट सासर्‍याचं घरच पेटवलं; बीडच्या पिंपळा धायगुडा येथील घटना
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Embed widget