मुंबई : पवई परिसरातून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. भूक लागल्याने आणि दूधासाठी रडणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या मुलाची त्याच्या जन्मदात्या पित्यानेच निर्घृण हत्या (Mumbai crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाच्या रडण्याचा राग आल्याने आरोपी वडिलांनी त्याला भिंतीवर आणि फरशीवर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पवई परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.(Mumbai crime News)
Mumbai Crime News : नेमकं काय घडलं?
मृत मुलाचे नाव यश सिंग (वय ४) असे असून, आरोपी वडिलांचे नाव राजेश प्रकाश सिंग आहे. राजेश हा पवईतील गौतमनगर-मोरारजीनगर परिसरात आपल्या कुटुंबासह (Mumbai crime News) वास्तव्यास आहे. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळच्या सुमारास यश हा भूक लागल्याने आणि दूधासाठी हट्ट करत रडत (Mumbai crime News) होता. मात्र मुलाचे सतत रडणे राजेशला सहन झाले नाही. संतापाच्या भरात त्याने मुलाला बेदम मारहाण केली. (Mumbai crime News)
Mumbai Crime News : मुलाला उचलून भिंतीवर आपटले
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करताना आरोपीने मुलाला उचलून भिंतीवर आपटले. त्यानंतर त्याचे डोके फरशीवर आदळल्याने यश गंभीर जखमी झाला. मुलाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.(Mumbai crime News)
घटनेची माहिती आरोपीच्या बहिणीला मिळाल्यानंतर तिने तातडीने पोलिसांना याबाबत कळवले. माहिती मिळताच पवई पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतर मुलाच्या मृत्यूमागील नेमके कारण अधिक स्पष्ट होणार आहे.(Mumbai crime News)
या प्रकरणी पवई पोलिसांनी आरोपी राजेश सिंग याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात मुलाच्या रडण्याचा राग अनावर झाल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. पोलिस आरोपीची चौकशी करत असून कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले जात आहेत. दरम्यान, जन्मदात्या पित्यानेच आपल्या लहान मुलाचा जीव घेतल्याच्या या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. एका क्षणाच्या रागामुळे एका निष्पाप बालकाचा जीव गेल्याने स्थानिक नागरिकांनीही दुःख व्यक्त केले आहे. पवई पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.(Mumbai crime News)
