Mumbai Crime News : मुंबईशहरातूनएकखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. मुंबई हायकोर्टाच्या स्टाफसाठी गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरने आत्महत्या करतआपलीजीवनयात्रासंपवलीआहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T- 2 परिसरातील इमारतीवरून उडी मारून (Crime News)ही आत्महत्या केल्याचीमाहितीआहे. मिळालेल्यामाहितीनुसार, जीवनसंपवण्यापूर्वी अर्धा तासापूर्वी ड्रायव्हर एअरपोर्टमध्ये खाली गाडी पार्क करून वरती चढला होता. त्यानंतर इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचीमाहितीआहे. या धक्कादाय घटनेनंतरपरिसरातखळबळउडालीअसूनसध्यापोलीसयाप्रकरणाचाअधिकतपासकरतआहे. (Mumbai Crime News)

Continues below advertisement

मिळालेल्यामाहितीनुसार, या ड्रायव्हरचअंदाजेवय 50 ते 52 वर्ष आहे, हायकोर्टाच्या स्टाफला हायकोर्ट ते एअरपोर्ट पिकअप आणि ड्रॉप करण्यासाठी ते गाडी चालवतहोते. मात्र, आत्महत्या करण्यामागचंनेमकं कारण काय? हेअद्यापकळूशकलंनाही. यासंदर्भात सध्या सहार पोलिसांनी नोंदकरत सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील तपास सुरुकेलाआहे. तर हायकोर्टाच्या ड्रायव्हरने आत्महत्या केल्यामुळे सध्या एअरपोर्ट परिसरात प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

Ratnagiri : ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; कारण न दाखवता कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप

Continues below advertisement

दरम्यान, असाचकाहीसा धक्कादायक प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारात घडला आहे. ई-शिवाई खाजगी बसच्या चालकाने फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. ई-शिवाईच्या चार चालकांना कोणतेही कारण न दाखवता कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या चालकांना संबंधितांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या एका चालकाने टोकाचे पाऊल उचलले. फिनाईल प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एसटी आगारातील चालकांच्या कामाच्या परिस्थितीचा आणि प्रशासनाच्या भूमिकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Mumbai Crime: कांदिवलीत 13 बालकामगारांची सुटका; इमिटेशन ज्वेलरी युनिटवर चारकोप पोलिसांचा छापा

कांदिवली पश्चिमेतील चारकोप इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात इमिटेशन ज्वेलरी आणि बांगड्या बनविणाऱ्या युनिटवर चारकोप पोलिसांनी कारवाई करत तब्बल 13 अल्पवयीन बालकामगारांची सुटका केली आहे. झहारा फॅशन एरा येथे ही कारवाई करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या मुलांचे वय 13 ते 17 वर्षांदरम्यान असून, ही सर्व मुले पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यांतील असल्याचे समोर आले आहे. या मुलांकडून दररोज तब्बल 9 ते 10 तास काम करून घेतले जात होते. तसेच त्यांना योग्य वेतन दिले जात नसल्याचा पोलिसांचा दावा आहे.

विशेष म्हणजे, या अल्पवयीन मुलांच्या राहण्याची व्यवस्थाही कामाच्या ठिकाणीच करण्यात आली होती. मुलांच्या वयाची खात्री करण्यासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे सादर करण्यात युनिटचा मालक आणि ऑपरेटर अपयशी ठरल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इतर महत्वाच्या बातम्या