Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Chembur Crime News : चेंबुर येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत घडला आहे. चक्क उद्योगपती एलन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव देऊन 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे.

Mumbai Crime News : वेगवेगळ्या युक्त्या वापरून सायबर गुन्हेगार (Cyber Crime) अनेकांची आर्थिक फसवणूक (Crime News) करत असतात. या संदर्भात वेळोवेळी पोलिसांकडून सावधानतेचे आवाहन देखील करण्यात येतं. मात्र असे असताना नागरिकांना भूलथाप मारत सायबर गुन्हेगार नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवतच असतात. असाच काहीसा प्रकार चेंबुर (Mumbai Crime News) येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत घडला आहे. चक्क उद्योगपती एलन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव देऊन 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. (Chembur Crime News)
Mumbai Crime : विमान तिकिटाच्या बहाण्याने तसेच वीसा प्रोसेसिंगच्या नावाखाली तब्बल 16 लाख 34 हजार रुपये उकळले
मिळेलेल्या माहितीनुसार, विमान तिकिटाच्या बहाण्याने तसेच वीसा प्रोसेसिंगच्या नावाखाली महिलेकडून तब्बल 16 लाख 34 हजार रुपये उकळले आहे. सप्टेंबर महिन्यांपासून पासून हि फसवणूक सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. कथित एलॉनने चेंबुरला राहणाऱ्या महिलेला लग्नासाठी मागणी घालून महिलेला जाळ्यात ओढलं. सोबतच 16 लाख देऊन देखील पैसे मागणीच सत्र सुरूच असल्याने महिलेला संशय आला. परिणामी महिलेने आपल्या कुटुंबियांना घडलेल्या प्रकार सांगितला असता महिलेची फसवणूक झाल्याच उघड झालं.
Mumbai Crime News : लग्नासाठी मागणी, अमेरिकेत घेऊन जाण्याचे आश्वासन, गुन्हा दाखल
दरम्यान, महिलेच्या तक्रारीवर पूर्व विभाग साइबर पोलीस ठाण्यात दोघा अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात एलन मस्क म्हणून ओळख सांगणाऱ्या एका फसवणूक करणाऱ्याने एक्सवर महिलेशी संपर्क साधला होता. त्याने तिला सिग्नल मेसेजिंग ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले, जिथे त्यांनी अनेक दिवस चॅटिंग केले. आरोपीने तिला लग्नासाठी मागणी घातली आणि तिला अमेरिकेत घेऊन जाईन, असे सांगितले. मात्र व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली अमेजॉनवरून गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास आणि त्यांचे कोड आणि तिकीटच्या नावाखाली महिलेकडून लाखो रुपये उकळल्याचे पुढे आले आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा
- Chhatrapati Sambhajinagar Crime: नपुंसकत्व लपवून मुलाचा थाटामाटात विवाह, शरीरसंबंध टाळण्यासाठी नवसाचं नाटक; खरं कळताच मुलीच्या पायाखालची वाळू सरकली; छ. संभाजीनगरमधील घटना
- Nashik Crime News: दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर, 400 कोटींची रोकड, नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले अन्... ठाण्यातील बिल्डरवर संशय
























