एक्स्प्लोर

मुंबईत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई, 53 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 आरोपीं पोलिसांच्या ताब्यात

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 11 ने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. ​नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'कोडेन फॉस्फेटयुक्त सिरप'चा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 11 ने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. ​नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'कोडेन फॉस्फेटयुक्त सिरप'चा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. तब्बल 52 लाख 7 हजार 400 रुपये किंमतीच्या एकूण 4 हजार 734 बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. बेकायदेशीरपणे साठा करुन विक्री करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.

52 लाखांच्या अमली पदार्थांसह 1 लाख रुपये किमतीची एक मोटारसायकल जप्त​

मालाड (पश्चिम) येथील एस.व्ही. रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरून पहिली अटक केली आहे. त्यानंतर आरोपीच्या सांगण्यावरून खारघर (नवी मुंबई) येथील गोदामावर छापा टाकला आहे. 52 लाखांच्या अमली पदार्थांसह 1 लाख रुपये किमतीची एक मोटारसायकल, असा एकूण 53 लाख 7 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मालाड पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा कक्ष 11 (कांदिवली) कडून पुढील तपास सुरु आहे. 

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातही मोठी कारवाई, 9 लाखांच्या गांजाच्या झाडांचा साठा जप्त

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील  येलूर येथे शेतातील 9 लाखांच्या गांजाच्या झाडांचा साठा ईश्वरपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण 44 किलो वजनाची 48 झाडे जप्त करण्यात आली आहेत. उसाच्या शेतात असलेली ही गांजाची 8 ते 9  फूट उंचीची आणि 44 किलोहून अधिक वजनाची 48 झाडे जप्त केली. त्याची किंमत 8 लाख 89 हजार रुपये इतकी आहे. याबाबत पोलिस कर्मचारी विशाल पांगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र सदाशिव माळी (वय 49) आणि आनंदा भीमराव चव्हाण (दोघे रा. येलूर) यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

गोंदिया रेल्वे स्थानकावर मादक पदार्थाच्या तस्करीवर कारवाई

रेल्वे सुरक्षा बल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाने ऑपरेशन नार्कोस अंतर्गत मादक पदार्थाच्या तस्करीवर कारवाई केली आहे. गोंदिया येथे पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या एस- 3 कोच मधील इंजिन साईडच्या शौचालयाच्या छतावरून एक लावारिस चेक बॅग मिळाली. त्यात 4 पॅकेट गांजा आढळून आला. या गांज्याचे एकूण वजन 7.972 किलोग्रॅम असून त्याची किमत 3 लाख 98 हजार 600 रुपये आहे. आरपीएफने राज्य पोलिस आणि इतर कायदा अंमलदार संस्थांबरोबर समन्वय साधून ही कारवाई केली. गोंदिया रेल्वे स्थानकावर मंडल टास्क टीम व आरपीएफ पोस्ट गोंदिया यांनी ही कार्यवाही केली.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Tajmahal Hotel Threat Call : दाऊदने बॉम्ब ठेवलाय; मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बची धमकी, पोलीस कंट्रोलला रात्री 12.13 वाजता कॉल, पुढे काय घडलं?
दाऊदने बॉम्ब ठेवलाय; मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बची धमकी, पोलीस कंट्रोलला रात्री 12.13 वाजता कॉल, पुढे काय घडलं?
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Pune Crime News: नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Maharashtra Farmers: आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
Pune Crime News: नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'
एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'
Embed widget