Mumbai Crime News: सतत फोनवर बोलण्याच्या संशयातून आणि कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्याच पत्नीचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना मुंबईतील ओशिवरा (Oshivara) परिसरात उघडकीस आली आहे. ओशिवऱ्यातील गुलशननगर (Gulshan Nagar) येथील रोस्वाल्ट बिल्डिंगमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत शबरून नेला अन्सारी (वय 25) असे प्राणास मुकलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी (Oshivara Police Station) संशयित पती सेराज अन्सारी याला तातडीने अटक (Arrested) केली आहे.

Continues below advertisement

Mumbai Crime News: पहिल्या पतीशी वारंवार बोलण्यावरून वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शबरून हिचा सेराज अन्सारी याच्यासोबत दुसरा विवाह झाला होता. मात्र, लग्न झाले तरीही शबरून ही तिच्या पहिल्या पतीशी फोनवर वारंवार बोलत असे. या गोष्टीचा पती सेराज याला तीव्र राग होता. पहिल्या नवऱ्याशी होणाऱ्या या संभाषणावरून त्यांच्यात वाद होत होते. 

Mumbai Crime News: रागाच्या भरात गळा आवळून संपवले आयुष्य

सोमवारी रात्रीच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने रागाच्या भरात सेराजने शबरूनचा गळा आवळून तिचे आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून आरोपी सेराज अन्सारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Continues below advertisement

Nashik Crime News: नाशिकमध्ये 15 वाहनांची तोडफोड

दरम्यान, नाशिक शहरातील उपनगर परिसरातील सुंदरनगर भागात अज्ञात तरुणांनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात तरुण गाड्यांवरून परिसरात आले आणि त्यांनी रस्त्यालगत उभ्या असलेल्या सुमारे 10 ते 15 वाहनांची तोडफोड केली. या घटनेत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्याच्या आधारे पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून अज्ञात तरुणांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

आईला वाचवायला गेला अन् चिमुकल्याचाही जीव गेला; नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल, नाशिकमधील 'त्या' घटनेचं धक्कादायक कारण समोर