Mumbai Porn Couple Arrested: काशीगाव पोलिसांनी पॉर्न फिल्म शूट करून ती ऑनलाइन पॉर्न साइटवर विकणाऱ्या पती-पत्नीला अटक केली आहे. दीपंकर आणि त्याची पत्नी रश्मी उर्फ ‘बंटी-बबली’ या जोडप्याने 2023 मध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पाली व्हिलेज रिसॉर्टमध्ये ही फिल्म (Porn Film) शूट केली होती. या प्रकरणात अद्याप संबंधित कलाकार पोलिसांच्या टप्प्यात आलेले नाहीत. (Mumbai Crime news)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर फिल्म 2024 मध्ये एका पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आली होती. 23 जून 2025 रोजी काशीगाव पोलीस ठाण्यात एका तक्रारदाराने दिलेल्या माहितीनंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात या पती-पत्नीचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी (Mumbai Police) गोरेगाव येथून त्यांना अटक केली. हे दोघेही गोरेगावच्या पूर्वेला असणाऱ्या काशीगाव येथे वास्तव्याला आहेत. 

गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात वापरले गेलेले पाली व्हिलेज रिसॉर्ट हे एका निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मालकीचे असून या रिसॉर्टचा वापर अशा गैरकृत्यांसाठी कसा झाला, याचा तपास आता सुरू आहे. दीपंकर आणि रश्मी यांच्या विरोधात यापूर्वीही चारकोप आणि मालवणी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यांनी शूट केलेली पॉर्न फिल्म व्यावसायिक हेतूने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकण्यात आले होते, असे तपासातून स्पष्ट झाले आहे.

सध्या पोलीस पाली रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेज, आर्थिक व्यवहार आणि शूटिंगवेळी उपस्थित असलेल्या कलाकारांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता असल्याची माहिती झोन 1 डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी दिली. पोलिसांकडून सध्या दीपंकर आणि रश्मी यांची चौकशी सुरु आहे. यापूर्वी दोघांवर अश्लील व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. मात्र, पॉर्न व्हिडीओ तयार करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याचे रिसॉर्ट वापरल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्याचीही चौकशी होणार का, हे बघावे लागेल. तसेच आता या पती-पत्नीच्या चौकशीतून आणखी कोणती नवी माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

आणखी वाचा

मृत्यू टाळण्यासाठी गर्लफ्रेंड अथवा वेश्येसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला, मोबाइल एखाद्या विशिष्ट कोनात ठेवायला लावायचा अन्..; मुळशीच्या भोंदूबाबाचे कारनामे उघड

खळबळजनक! नागपुरातील प्रतिष्ठित हॉटेलमध्ये परदेशातील तरुणींकडून नको ते कृत्य; पोलिसांचा छापा, उझबेकिस्तान मधील तरुणीची सुटका