Mumbai Crime News : तस्करीचे सोनं वितळवून बाजारात त्याची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना सक्तवसूली संचालनालयाने अटक केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दोघांकडून 10 कोटींच्या सोन्याचा पर्दाफाश केला आहे. मुंबईच्या काळबादेवी (Kalbadevi) परिसरात हे दोघे सोने (Gold) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती डीआरआय (DRI) अधिकाऱ्यांना होती. या माहितीच्या आधारेपोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे. स्वप्निल जाधव आणि श्रेयस साळुंखे अशी या दोघांची नावे आहेत.

Continues below advertisement

तपासत दोघांकडे असलेल्या वर्तमानपत्रात एकूण पाच किलो वजनाचे सोन्याचे बार आढळले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 10 कोटी रुपये इतकी आहे. अधिकाऱ्यांनी या सोन्यासंदर्भात तुमच्याकडे काही कागदपत्रे आहेत का, अशी विचारणा केली असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर हे सोने कुठे घेऊन जात असल्याची त्यांना विचारणा केली असता त्यांनी अधिकाऱ्यांना एका लहानशा कारखान्यात नेले. तिथे अधिकाऱ्यांनी सोने वितळविण्याची कटिंग तसेच पॉलिश करण्याची यंत्रणा आढळून आली. त्या ठिकाणाहून अधिकाऱ्यांनी काही रोख रक्कमदेखील जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्रयाकारवाईमुळेमोठीखळबळउडालीआहे.

Santacruz Police : सांताक्रूझ पोलिसांकडून अवघ्या 12 तासांत हत्येचा गुन्हा उघड

Continues below advertisement

दुसरीकडे, सांताक्रूझ पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अशोक गाऊड (40) यांच्या हत्येचा गुन्हा उघड केला. जूहू कोळीवाडा येथील जेट्टीजवळ गोणपाटात आढळलेल्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख हातातील जांभळ्या दगडाच्या अंगठीवरून पटली आहे. तर मृतदेह कंबरेखालून तुटलेला होता. दरम्यान, या तपासात समोर आले की, गाऊड यांची सुमारे 10 दिवसांपूर्वी हत्या करून मृतदेहाचे दोन तुकडे करण्यात आले आणि मालवणी येथील नाल्यात टाकण्यात आले. यानंतर ते वाहत जूहूपर्यंत आले.

Crime News : कारखान्यात बोलावून दारू पाजली व वादानंतर चाकूने वार करून हत्या

या प्रकरणी घाटकोपर (पश्चिम) येथील वस्त्रव्यवसायिक वहीद अली शेख ऊर्फ मित्तू (30) याला अटक करण्यात आली. गाऊड हे त्याच्या कारखान्यात काम करत होते. शेख आणि गाऊड यांच्या पत्नीमधील कथित अनैतिक संबंधांबाबत गाऊडला माहिती झाल्याने शेखने त्याला कारखान्यात बोलावून दारू पाजली व वादानंतर चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. CCTV फुटेजमध्ये शेख नाल्यात पिशव्या टाकताना दिसल्याचे पोलिसांनी सांगितले. गाऊड यांच्या पत्नीने यापूर्वी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिस पुढील तपास करत असून खुनात वापरलेले हत्यार शोधत आहेत.