Mumbai Crime News:मुंबईतील सांताक्रुझ पूर्वेकडील कलिना परिसरात Free Fire गेमच्या ID वरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुंची कुरवे नगर परिसरातील सेंट रॉक चर्चच्या पायऱ्यांजवळ 30 सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Mumbai Crime News)

Continues below advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिलशाद शाह याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन Free Fire गेमच्या ID वरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी आणि त्यानंतर चाकूहल्ल्यात झाल्याचा प्राथमिक तक्रारीत उल्लेख आहे.

30 सप्टेंबरच्या मध्यरात्री सुमारे दीड वाजता कलिना येथील कुंची कुरवे नगर परिसरात हा प्रकार घडला. सेंट रॉक चर्चच्या पायऱ्यांजवळ काही जणांमध्ये वाद झाला. या वादातून दिलशाद शाह याच्या गळ्यावर चाकूने गंभीर वार करण्यात आल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली.

Continues below advertisement

Mumbai Crime News: पोलिसांकडून तिघांना अटक

या प्रकरणी सलमान फारुक शाह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरबेज शाह, मुसाहिद वकील अहमद खान, कौसर अली जमील शाह आणि अनस सय्यद यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुसाहिद वकील अहमद खान, अरबेज शाह आणि कौसर अली जमील शाह या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितामधील कलम 109, 118(1), 351(3), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. हल्ल्याचे नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि या घटनेमागील इतर पार्श्वभूमीचा तपास पोलीस करत आहेत.

विशेष म्हणजे, तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या ऑनलाइन गेमच्या ID वरून सुरू झालेला वाद चाकूहल्ल्यापर्यंत पोहोचल्याने या घटनेची चर्चा होत आहे. गेममधील ID वरून वाद इतका वाढला की, दिलशाद शाह याच्या गळ्यावर चाकूने गंभीर वार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, जखमी दिलशाद याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.  

आणखी वाचा

Solapur Crime: पार्किंगवरून वाद विकोपाला, मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी तुडवले, वार करत जागीच संपवले; सोलापूर हादरले!