Mumbai Crime News : मुंबईत परदेशी शिक्षणाच्या (Foreign Education) नावाखाली कोट्यवधींची फसवणूक (Fraud) झाल्याच्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठवणाऱ्या एका एजन्सीने डिसेंबर महिन्यात पालक आणि विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोरं आलं आहे. चारकोप (Charkop) परिसरातील करिअर अँड ऑप्शन्स सर्व्हिस लिमिटेड या एजन्सीविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात (Charkop Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यां प्रकरणात एजेन्सीचे मालक स्टेला मेहता आणि राकेश मेहता हे मुख्य आरोपी आहेत.

Charkop Crime News : 19 जणांची मिळून 2 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक

दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीला 13 तक्रारदार होते. मात्र आता तक्रारदरांची संख्या 19 वर गेली असून फसवणूकीचा आकडा देखील वाढला आहे. आधी एकूण पावणे दोन कोटींची दिसणारी फसवणूक आता जवळपास तीन कोटींपर्यंत गेली आहे. या 19 जणांची मिळून 2 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. केवळमुंबईच नाही तर नाशिकमधील एका विद्यार्थयांची देखील या दाम्पत्याने फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.यातील आरोपी स्टेला मेहता आणि राकेश मेहता यांचा शोध सध्या पोलीस घेत असू दोघांनी ओरिसाला पळ काढल्याची माहिती सध्या समोर आली आहे. मात्रयाफसवणुकीच्याप्रकारामुळेमोठीखळबळउडालीआहे. दरम्यानयाप्रकरणीआता आरोपींचाशोधघेणेहे पोलिसांपुढचंआव्हानअसणारआहे. तरअशाफसवणुकीलाबळीपडतासावधगिरीबाळगावी, असंआवाहनपोलिसांकडूनकरण्यातआलंआहे.

Mumbai Crime News : तक्रारदारांची नावे आणि फसवणुकीची रक्कम:

रेणुका मेनन – ₹10,00,000

नेहल जोशी – ₹11,00,000

एडविन – ₹17,50,000

दिलीप पटेल – ₹14,82,000

देवांश – ₹20,94,000

सायली परब – ₹4,60,000

महेंद्र देढिया – ₹9,00,000

किंबर्ली लोबो – ₹16,91,000

मुकेश मुदहोळकर – ₹2,75,000

मोहम्मद रिजवी – ₹13,00,000

संदीप डुस्तकार – ₹3,20,000

अनिल अथर्व गावंडे – ₹14,85,492

मुकेश पाटील – ₹22,00,000

मुस्कान लुल्ला – ₹3,85,000

हर्षद दवे - ₹3867996

स्वाती दरेकर - ₹3997918

शैलेश पानचाळ - ₹1824693

दिलीप अग्रवाल - ₹2221154

एकूण रक्कम - ₹2,83,54,253

ही बातमी वाचा: