Mumbai Crime : मुंबईत परदेशी शिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; चारकोप पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल, नवीन तक्रारदार समोर
Mumbai Crime News : मुंबईत परदेशी शिक्षणाच्या (Foreign Education) नावाखाली कोट्यवधींची फसवणूक (Fraud) झाल्याच्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mumbai Crime News : मुंबईत परदेशी शिक्षणाच्या (Foreign Education) नावाखाली कोट्यवधींची फसवणूक (Fraud) झाल्याच्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठवणाऱ्या एका एजन्सीने डिसेंबर महिन्यात पालक आणि विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोरं आलं आहे. चारकोप (Charkop) परिसरातील करिअर अँड ऑप्शन्स सर्व्हिस लिमिटेड या एजन्सीविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात (Charkop Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यां प्रकरणात एजेन्सीचे मालक स्टेला मेहता आणि राकेश मेहता हे मुख्य आरोपी आहेत.
Charkop Crime News : 19 जणांची मिळून 2 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक
दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीला 13 तक्रारदार होते. मात्र आता तक्रारदरांची संख्या 19 वर गेली असून फसवणूकीचा आकडा देखील वाढला आहे. आधी एकूण पावणे दोन कोटींची दिसणारी फसवणूक आता जवळपास तीन कोटींपर्यंत गेली आहे. या 19 जणांची मिळून 2 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. केवळ मुंबईच नाही तर नाशिकमधील एका विद्यार्थयांची देखील या दाम्पत्याने फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.यातील आरोपी स्टेला मेहता आणि राकेश मेहता यांचा शोध सध्या पोलीस घेत असू दोघांनी ओरिसाला पळ काढल्याची माहिती सध्या समोर आली आहे. मात्र या फसवणुकीच्या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी आता आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांपुढचं आव्हान असणार आहे. तर अशा फसवणुकीला बळी न पडता सावधगिरी बाळगावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
Mumbai Crime News : तक्रारदारांची नावे आणि फसवणुकीची रक्कम:
रेणुका मेनन – ₹10,00,000
नेहल जोशी – ₹11,00,000
एडविन – ₹17,50,000
दिलीप पटेल – ₹14,82,000
देवांश – ₹20,94,000
सायली परब – ₹4,60,000
महेंद्र देढिया – ₹9,00,000
किंबर्ली लोबो – ₹16,91,000
मुकेश मुदहोळकर – ₹2,75,000
मोहम्मद रिजवी – ₹13,00,000
संदीप डुस्तकार – ₹3,20,000
अनिल अथर्व गावंडे – ₹14,85,492
मुकेश पाटील – ₹22,00,000
मुस्कान लुल्ला – ₹3,85,000
हर्षद दवे - ₹3867996
स्वाती दरेकर - ₹3997918
शैलेश पानचाळ - ₹1824693
दिलीप अग्रवाल - ₹2221154
एकूण रक्कम - ₹2,83,54,253
ही बातमी वाचा:
























