Mumbai Crime News: मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध गोराई (Gorai) परिसरातून अत्यंत सुन्न करणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत होणाऱ्या कौटुंबिक वादातून (Family Dispute) एका नराधम बापाने स्वतःच्याच 10 वर्षांच्या निष्पाप मुलाला समुद्रात नेऊन संपवल्याचा (Drowned) संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी गोराई पोलिसांनी (Gorai Police) तात्काळ चक्र फिरवत आरोपी वडिलांच्या मुसक्या आवळल्या आहेत. बंटी राव (वय 40) असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या आरोपी वडिलांचे नाव आहे.
Mumbai Crime News: काय आहे नेमके प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बंटी राव हा आपली पत्नी, 18 वर्षांची मुलगी आणि 10 वर्षांचा मुलगा यांच्यासह मालाड (Malad) येथील मालवणी (Malvani) परिसरात राहत होता. तो गोराई समुद्रकिनाऱ्यावर (Gorai Beach) येणाऱ्या पर्यटकांचे फोटो काढण्याचे काम करत असे. गेल्या काही दिवसांपासून बंटीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणावरून दांपत्यामध्ये दररोज तीव्र भांडणे होत होती.
Mumbai Crime News: मृतदेह समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळला
सततच्या वादविवादांमुळे घरातील वातावरण तापलेले असतानाच, बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गोराई समुद्रकिनाऱ्यावर स्थानिकांना एका लहान मुलाचा मृतदेह समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. स्थानिकांनी त्वरित याबाबत गोराई पोलिसांना माहिती दिली. घटनेची गंभीरता ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. तपासादरम्यान हा मृतदेह 10 वर्षांच्या चिमुकल्याचा असल्याचे उघड झाले.
Mumbai Crime News: चौकशीत धक्कादायक माहिती उघड
गोराई पोलिसांनी या प्रकरणी संशयित म्हणून मृत मुलाचे वडील बंटी राव याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या बंटीने अखेर पोलिसांसमोर सत्य माहिती सांगितली. पत्नीवरील संशयाच्या रागातून आणि कौटुंबिक वादाच्या भरात त्यानेच आपल्या 10 वर्षांच्या मुलाला गोराईच्या समुद्रात नेऊन बुडवले आणि त्याचा काटा काढला, असे माहिती त्याने पोलिसांना दिली. या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी नराधम वडिलांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. एका बापानेच आपल्या पोटच्या चिमुकल्याचा अशा क्रूरपणे काटा काढल्याने मुंबईत आणि गोराई परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
