वसई : मॅट्रिमोनियल वेबसाइटवर ओळख झालेला तरुण आयटी इंजिनिअर, वर्षाला तब्बल ३७ लाख रुपयांचा पगार, मुंबईत स्वतःचे घर आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व… लग्नासाठी हे स्थळ पाहून ३० वर्षीय डॉक्टर तरुणीला (Mumbai Crime News) पसंती पडली. फोनवरून दोघांचे बोलणे सुरू झाले आणि लग्नाची (Mumbai Crime News) चर्चाही पुढे सरकली. मात्र, त्यानंतर या प्रकरणात असा ट्विस्ट आला की, डॉक्टर तरुणीचीच नव्हे तर पोलिसांचीही भुवया उंचावल्या. आरोपी सुभाष सातपुते (३४) याने मॅट्रिमोनियल वेबसाइटवर ‘कुमार जाधव’ या नावाने बनावट प्रोफाइल (Mumbai Crime News) तयार केल्याचा आरोप आहे. आपण आयटी इंजिनिअर असून वर्षाला ३७ लाख रुपये कमावतो, असे त्याने डॉक्टरला सांगितले होते. लग्नाला होकार देण्यापूर्वी त्याने डॉक्टरसमोर एक अजब अट ठेवली. लग्नाआधी लैंगिक सुसंगतता तपासण्यासाठी तिने एका ‘प्लेबॉय’ला भेटावे, असे त्याने सांगितले. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांकही त्यानेच डॉक्टरला दिला.(Mumbai Crime News)
डॉक्टर त्याच्या सांगण्यावरून त्या व्यक्तीला भेटली. त्यानंतर घडलेल्या प्रकाराचे चित्रीकरण करून ते आरोपीला पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आता लग्न होईल, अशी डॉक्टरची अपेक्षा असतानाच आरोपीने पुन्हा नवा बहाणा केला. ‘ज्योतिषाचा सल्ला घेतला असून, तुझ्याशी लग्न केल्यास तीन महिन्यांत माझा मृत्यू होईल,’ असे सांगत त्याने लग्नास नकार दिला. मात्र, त्यानंतर डॉक्टरला धक्कादायक सत्य समजले. ज्याला आपण ‘प्लेबॉय’ समजून भेटलो, तो दुसरा-तिसरा कोणी नसून खुद्द सुभाष सातपुतेच होता, असा पोलिसांचा आरोप आहे. म्हणजेच इंजिनिअरच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करणारा आणि प्लेबॉय म्हणून डॉक्टरला भेटणारा व्यक्ती एकच असल्याचे समोर आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून नालासोपारा येथील संतोष भुवन परिसरातून सुभाष सातपुतेला अटक केली. आरोपीने अशाच प्रकारे अनेक बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार केल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. मॅट्रिमोनियल साइटवरील चमकदार प्रोफाइलच्या मागे नेमका कोण आहे, याची खातरजमा न करता पुढे जाणे किती धोकादायक ठरू शकते, हे या प्रकरणातून समोर आले आहे.
असा झाला भांडाफोड
तपास आणि शोधानंतर समोर आलेले सत्य अत्यंत धक्कादायक होते. ज्या व्यक्तीला तरुणी 'प्लेबॉय' समजून भेटली होती, तो दुसरा कोणी नसून खुद्द आरोपी सुभाष सातपुतेच होता. म्हणजेच आयटी इंजिनिअरच्या नावाने बनावट प्रोफाइल बनवणारा आणि 'प्लेबॉय' बनून भेटणारा व्यक्ती एकच असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित डॉक्टर तरुणीने वालीव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान (IT Act) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत नालासोपारा येथील संतोष भुवन परिसरातून आरोपी सुभाष सातपुतेला अटक केली आहे. आरोपीने अशाच प्रकारे अनेक बनावट सोशल मीडिया अकाउंट्स तयार केल्याचेही तपासात उघडकीस आले आहे.
