Mumbai Crime News: मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्यात (Borivali Police Station) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. तक्रारदार आणि त्यांच्या दोन बहिणींवर अटकेची कारवाई न करण्यासाठी 1 लाख 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) ज्ञानेश्वर पराडे याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे मुंबई पोलीस वर्तुळात (Mumbai Police Department) मोठी खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime News: काय आहे नेमके प्रकरण?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 31 वर्षीय आरोपी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पराडे (Dnyaneshwar Parade) याने तक्रारदार आणि त्यांच्या दोन बहिणींविरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटक (Arrest) न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी सुरुवातीला 1 लाख 50 हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई घटकाकडे तक्रार दाखल केली.
Mumbai Crime News: ACB कडून पडताळणी अन् ट्रॅप
तक्रारदाराच्या अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान दोन्ही बाजूंच्या तडजोडीअंती लाचेची रक्कम 1 लाख 30 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर, सोमवारी (5 ऑक्टोबर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बोरीवली पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. सायंकाळी 5.42 वाजता बोरीवली पोलीस ठाण्यातच 1 लाख 30 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना PSI ज्ञानेश्वर पराडे याला ACB च्या पथकाने रंगेहाथ पकडले.
Mumbai Crime News: गुन्हा दाखल, घराची झडती सुरू
कारवाईदरम्यान ACB च्या पथकाने आरोपी PSI चा मोबाईल (Mobile Phone) जप्त केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, आरोपीच्या घराची झडती देखील ACB कडून घेतली जात आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
