Mumbai Crime News: मुंबईतील (Mumbai) वर्सोवा पोलीस ठाण्याच्या (Versova Police Station) हद्दीत पोलिसांच्या अमानुष आणि अत्यंत निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कार अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पोलीस ठाण्यातच 'ब्रेन स्ट्रोक' (Brain Stroke) आला असतानाही, पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात न नेता तब्बल 5 तास पोलीस ठाण्यातच बसवून ठेवले. याप्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) आणि नगरसेवक रोहन राठोड (Rohan Rathod) आक्रमक झाले असून दोषी पोलिसांवर कारवाईसाठी थेट पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे.
Mumbai Crime News: किरकोळ अपघातानंतर वृद्धाला घेतले ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी नगरसेवक रोहन राठोड यांचे नातेवाईक असलेले 73 वर्षीय शरद कदम (Sharad Kadam) हे आपल्या वॅगनआर (WagonR) कारने जात असताना वर्सोवा परिसरात एका महिला डॉक्टरच्या (Female Doctor) कारला किरकोळ धडक बसली. या अपघातानंतर महिला डॉक्टरने पोलिसांना फोन केला. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शरद कदम यांना ताब्यात घेतले. वृद्ध कारचालकाने दारू प्यायल्याचा संशय महिला डॉक्टरने व्यक्त केला होता.
Mumbai Crime News: पोलीस ठाण्यातच आला 'ब्रेन स्ट्रोक', पण पोलिसांनी 5 तास अडवून ठेवले
पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असतानाच 73 वर्षीय शरद कदम यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना 'ब्रेन स्ट्रोक' (Brain Stroke) आला. वैद्यकीय शास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा 'गोल्डन अवर' सुरू असताना, पोलिसांनी त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवणे आवश्यक होते. मात्र, वर्सोवा पोलिसांनी कोणतीही वैद्यकीय मदत न देता त्यांना तब्बल 5 तास पोलीस ठाण्यातच बसवून ठेवले.
Mumbai Crime News: भाजप नेत्यांची धाव अन् कूपर रुग्णालयात दाखल
या घटनेची माहिती मिळताच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि रोहन राठोड यांनी तात्काळ पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात पाठवले आणि शरद कदम यांना तातडीने विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांच्या या बेफिकिर वृत्तीमुळे रुग्णाचा जीव धोक्यात आल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Mumbai Crime News: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत वर्सोवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी पोलीस उपायुक्तांना पत्र लिहिले आहे. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या संपूर्ण प्रकरणाची सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या तपासात जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळतील, त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वरिष्ठ पोलिसांनी दिला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
