Mumbai Crime News : मन हेलावून टाकणारी घटना मुंबईतून समोर आली आहे. सावत्र आईच वैरणी झाल्याचा प्रकार घडलाय. मुंबईच्या अंधेरी पूर्वे एमआयडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून चार लहान मुलं हरावल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामध्ये सावत्र आईचा हात असल्याची शंका मामाला आहे. तीन मुली अन् एका मुलाचा यामध्ये समावेश आहे. सावत्र आईने तीन मुली अन् मुलाला विकल्याची शंका मामाने व्यक्त केली आहे. 


वडील आणि सावत्र आई यांच्याकडून 25 मे 2024 रोजी चारही मुलांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर 26 तारखेला चारही मुले घरातून दिल्लीसाठी निघाले होते.  मात्र खंडवा स्टेशन वरून चारही मुले गायब झाल्याचा आरोप मुलांच्या मामांनी केला आहे. मुलांच्या मामाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. एमआयडीसी पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेचे पथक चारही मुलांचा शोध घेत आहे. 


हरवलेली चारही मुलांमध्ये तीन बहीण, एक भाऊ आहे.  26 मे रोजी वडिलांनी आणि सावत्र आईने मुलांसोबत मारहाण केली, त्यानंतर मुलांनी घरातली पुस्तकं भंगारमध्ये विकून मिळालेला पैसे घेऊन सावत्र आई सोबत 26 तारखेला अंधेरीतून दादार आणि दादरतून कल्याण आणि कल्याणतून दिल्लीची मेल ट्रेन पकडून दिल्लीसाठी निघाले. मात्र सावत्र आई खंडवा रेल्वे स्टेशनवर पाणी भरण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरली आणि ट्रेन पुढे निघून गेली. त्यानंतर सावत्र आई खंडवा रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडून मुंबईला आली.


मुलांचे वडील पवन तिवारी हे 2002 मध्ये आरती तिवारी सोबत लग्न केले होते, मात्र कोरोना काळात 2022 मध्ये आरतीचा मृत्यू झाला. यानंतर मुलांचे वडील 2023 मध्ये दुसरं लग्न केले. मागील एक वर्षापासून चारही मुलं सावत्र आईसोबत राहत होते. या काळामध्ये सावत्र आई आणि वडिलांकडून मुलांना बेदम मारहाण केला जात असल्याचा आरोप मुलांच्या मामा दीनानाथ तिवारी यांनी केली आहे. मुलांचा मामा दीनानाथ तिवारीचा आरोप आहे की सावत्र आईने मुलांना विकून आली आहे. ट्रेन सुरू झाली पुढे गेली तर सावत्र आई ने RPF आणि GRP पोलिसांना का कळवला नाही...


चारही मुलांकडे मोबाईल नसल्यामुळे पोलिसांना तपासामध्ये वेळ लागत आहे. मागील 5 दिवसापासून एमआयडीसी पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखा युनिट 10 चे टीम त्या मुलांचा शोध घेत आहेत. सध्या मुलांचं सावत्र आईला एमआयडीसी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन रेल्वे स्टेशनवर असलेला प्रत्येक स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करून शोध घेत आहेत.