Mumbai Crime News: बलात्काराच्या घटनेनं मुंबई (Mumbai News) पुन्हा हादरली आहे. 20 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार (Rape Case) करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वरळी (Worli Crime News) परिसरात ही धक्कादायक घटना घडली. वरळी पोलीस स्थानकात (Worli Police Station) चिमुकलीच्या आईनं तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी 35 वर्षी व्यक्तीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुंबईतील (Mumbai Crime) वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 376 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे."


मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितेच्या आईनं नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे वरळी पोलीस आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम 376 आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास करत आहेत. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, चिमुकलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 35 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.


पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही एकाच परिसरातील रहिवासी आहेत. मुलीची आई काही काळासाठी घराबाहेर गेली होती, तेव्हा आरोपीनं चिमुकली घरात एकटी असल्याचं पाहिलं आणि तिला आपल्यासोबत नेलं. आरोपी मुलीला घेऊन आपल्या घरी आला. तिथेच त्यानं चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलीला त्यानं पुन्हा तिच्या घराबाहेर सोडलं. 


घरी आल्यानंतर मुलगी खूप रडत होती, तिला आईला सांगताही येत नव्हतं. आईलाही काही कळत नव्हतं. काही काळानं आईला काहीतरी अनुचित प्रकार घडत असल्याचा संशय आला. मुलीची आई तात्काळ मुलीला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली. त्यावेळी चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. मुलीच्या आईनं तात्काळ पोलीस स्थानक गाठलं आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि सदर आरोपीला अटक करण्यात आली. आज आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai Crime : गतिमंद मुलीवर तिघांचा बलात्कार; आरोपी अल्पवयीन, बालसुधारगृहात रवानगी