Mumbai Crime Drugs party Nesco: मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये (Nesco Center) 5 नंबर हॉलमध्ये म्युझिक कॉन्सर्ट कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुंबईच्या विविध महाविद्यालयांमधील तब्बल तीन ते चार हजार विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात उघडपणे ड्रग्जचे (Drugs Party) सेवन केले जात होते. यापैकी मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला. या कार्यक्रमातील 80 टक्के विद्यार्थ्यांनी ड्रग्ज घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) खडबडून जागे झाले असून युद्धपातळीवर याप्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. आतापर्यंत पोलिसांनी नेस्कोचे दोन कर्मचारी, एक आयोजक, दोन विद्यार्थी आणि ड्रग्ज पेडलर अशा सहा जणांना अटक केली आहे. (Mumbai Crime news)

Continues below advertisement

याप्रकरणी पोलिसांनी या पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्या आनंद पटेल या तरुणाला कल्याणमधून ताब्यात घेतले. पहाटे साडेपाचच्या सुमारास कल्याण येथील वायले नगर परिसरात असलेल्या घरातून पोलिसांनी आनंद पटेलला बेड्या ठोकल्या. पोलीस आल्यानंतर आनंद बराच काळ घराचा दरवाजा उघडत नव्हता. अखेर बरीच कसरत केल्यानंतर पोलिसांना आनंदला पकडण्यात यश मिळाले. खडकपाडा पोलिसांनी आनंद पटेल याला मुंबई पोलिसांच्या हवाली केले.

नेस्को सेंटरमधील या पार्टीत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यामुळे  यंत्रणांची झोप उडाली असून या प्रकरणामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी देखील प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहे. 

Continues below advertisement

DJ Italy 999999999: नेस्को सेंटरमध्ये लोकप्रिय डीजे कॉन्सर्टचे आयोजन, 

नेस्को सेंटरमध्ये शनिवारी रात्री इटलीचा ‘999999999’ टेक्नो DJ Duo जगभरात गाजणारा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता.  तरुणांमध्ये वाढती क्रेझ पाहता या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.  

इटलीचा ‘999999999’ टेक्नो DJ duo कार्यक्रम नेमका काय आहे?

* इलेक्ट्रॉनिक म्युझिकच्या दुनियेत इटलीतील 999999999 या टेक्नो DJ जोडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

* ‘नाईन टाईम्स नाईन’ या नावाने ओळखली जाणारी ही जोडी हार्ड टेक्नो आणि अॅसिड टेक्नो प्रकारातील म्युझिकसाठी प्रसिद्ध आहे.

* 2016 मध्ये सुरू झालेल्या या प्रोजेक्टने अल्पावधीतच जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक गाण्यांऐवजी ही जोडी DJ मशीन, सिंथेसायझर आणि ड्रम मशीनच्या साहाय्याने लाइव्ह परफॉर्मन्समध्येच म्युझिक तयार करते, ही त्यांची खासियत आहे.

* त्यांच्या म्युझिकमध्ये जोरदार बास, वेगवान बीट्स आणि सतत चालणारा repetitive रिदम यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. “300000003”, “Acid Blood” आणि “Love 4 Rave” यासारखे ट्रॅक्स टेक्नो चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहेत.

* ही जोडी Awakenings, Tomorrowland आणि Electric Daisy Carnival यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवांमध्ये परफॉर्म करत असून, त्यांच्या लाइव्ह सेट्सला मोठी गर्दी होत आहे.

* टेक्नो म्युझिकसोबत वाढत चाललेल्या रेव्ह आणि क्लब कल्चरमुळे तरुणांमध्ये याची लोकप्रियता वाढत गेली. नशेखोर अशा कार्यक्रमांमध्ये ड्रग्स सेवन करून गेल्यानंतर नशेची झिंग अधिक वाढते. यासाठी खास अशा लाईव्ह कॉन्सर्ट ला उपस्थिती लावतात.

आणखी वाचा

धक्कादायक! ड्रग्जच्या ओव्हर डोसने कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, मुंबईच्या गोरेगाव नेस्को संकुलातील घटना