Mumbai Crime : दादर (Dadar) येथील जलतरण तलावात (Swimming Pool) पाच वर्षांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात विशेष पोक्सो (POCSO) न्यायालयाने 30 वर्षीय तरुणाला तीन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. 6 मार्च 2020 रोजी घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

Continues below advertisement


नेमकं काय घडलं होतं?


13 वर्षीय एका मुलीने जलतरण तलावात असताना आरोपीने तिच्यावर आक्षेपार्ह स्पर्श केल्याचे लक्षात येताच तीने तात्काळ महिला प्रशिक्षक व जीवरक्षकाला याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आरोपीला थांबवून त्याला जाब विचारला असता, त्या मुलीने त्याला घटनास्थळीच ओळखले. दरम्यान, 12 वर्षीय दुसऱ्या एका मुलीनेही पुढे येत समान स्वरूपाचा अनुभव कथन केला आणि त्याच तरुणाकडे बोट दाखवत शोषण केल्याचा आरोप केला. दुसऱ्या दिवशी 13 वर्षीय मुलीच्या वडिलांनी दादर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.


आरोपीचा बचाव आणि तपास यंत्रणेचे उत्तर


न्यायालयात आरोपीने त्यावेळी तलावात सुमारे 30 लोक होते. मुलींनी चुकून त्याच्यावर आरोप केला, एफआयआर दाखल करण्यात उशीर झाला असून सीसीटीव्ही फुटेजही सादर झालेले नाहीत, असा युक्तिवाद केला.  या युक्तिवादावर सरकारी पक्षाने स्पष्ट उत्तर देताना म्हटले की, मुली घाबरलेल्या आणि अस्थिर होत्या, त्यामुळे एफआयआर दाखल करण्यात एक दिवस उशीर झाला. जलतरण तलावाच्या संबंधित भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नव्हते, त्यामुळे फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही, असे म्हटले.


न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण


विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, "पीडित मुलींनी घटनास्थळीच आरोपीला ओळखले आणि नंतर न्यायालयातही पुन्हा ओळखले. हे पुरावे ठोस आहेत. एफआयआरच्या विलंबावर आणि सीसीटीव्ही अभावावर सरकारी पक्षाने समाधानकारक स्पष्टीकरण दिले आहे. आरोपीने जाणीवपूर्वक या मुलींचा पाठलाग करत दुष्कृत्य केले, हे स्पष्टपणे सिद्ध होते," असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आरोपीवर दोष निश्चित मानत न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.



इतर महत्त्वाच्या बातम्या 


Navi Mumbai Crime : पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् किरकोळ वाद विकोपाला; संतापात पतीने पत्नीला निर्घृणपणे संपवलं; नवी मुंबईतील करावे गाव हादरलं!


स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय! पुण्यातील सनशाईन स्पा वर पोलिसांचा छापा, पाच महिलांची सुटका, तीन जणांना अटक