Mumbai Crime : मुंबईतील ओबेराय इंटरनॅशनल शाळेमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने शाळेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शाळेतील बाथरुममध्ये जात आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिकची माहिती अशी की, मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत ओबेराय इंटरनॅशनल शाळेमध्ये 11वीत मध्ये शिकणाऱ्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी अकरावीत शिकणाऱ्या मुलींने ओबेराय इंटरनॅशनल शाळेच्या बाथरूम मध्ये बुटांचे लेस चे साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळतात आरे पोलिसांनी शाळेत दाखल होत मुलीचा डेड बॉडी पोस्टमार्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. सध्या आरे पोलिसांनी अकस्मात मृत्यू (ADR) ची नोंद करत मुलींनी एवढा मोठा टोकाचा पाऊल का उचलला यामागे काय कारण आहे या संदर्भात अधिक तपास आरे पोलीस करत आहेत...
विकासकाकडून भाडे रखडल्यामुळे झोपडी धारकांची विष पिऊन आत्महत्या
जोगेश्वरी पूर्वेला एका खासगी प्रकल्पातील झोपडीधारकाने भाड न मिळाल्यामुळे विष पिऊन विकासकाच्या कार्यालयाबाहेर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत झोपडी धारकाचा जोगेश्वरीतील महापालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात गुरुवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. या झोपडीधारकाचे नाव अहमद हुसेन शेख असून त्याचे वय 46 वर्षे होते. अहमद यांची झोपडी ओमकार डेव्हलपर यांनी प्रकल्पासाठी निष्कासित केली. या झोपडीधारकाचे मागील चार वर्षापासून विकासकाकडे भाडे थकले असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केली आहे. मागील काही महिन्यापासून विकासकाच्या जोगेश्वरी पूर्व जनता मार्केट समोर असलेल्या कार्यालयात अहमद भाडे मिळण्यासाठी फेऱ्या मारत असल्याची माहिती समोर येत आहे. अखेर अहमद यांनी बुधवारी सायंकाळी कार्यालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र अहमद यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलिसांनी अहमद यांच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. मृत अहमद यांचे चार भाऊ आहेत, प्रकल्पातील रूम ही आईच्या नावावर आहे. मात्र आईचे निधन झाले. त्यामुळे चारही भावंडांनी भाडं मिळण्यासाठी विकासकाकडे दावा केला. यामुळे विकासकांनी भाडे कोणाला द्यायचे, या संदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण झालं, अशी माहिती मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात