एक्स्प्लोर

Mumbai BEST Bus Accident: भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं, तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आली अन् बस थेट....

Mumbai BEST Bus Accident: मुंबईतील भांडुप (Bhandup) परिसरात बेस्ट बसचा झालेल्या एका विचित्र अपघाताने (Accident) परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

Mumbai BEST Bus Accident: मुंबईतील भांडुप (Bhandup) परिसरात बेस्ट बसचा झालेल्या एका विचित्र अपघाताने (Accident) परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. भांडुपमधील कोकण नगर (Kokan Nagar) येथील क्रिटिकल रुग्णालय (Critical Hospital) परिसरात एका अनियंत्रित बसने परिसरातील काही पादचाऱ्यासह रस्त्यावरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या भाषण अपघातात वाहनांचे मोठं नुकसान झाले आहे. तर अपघातग्रस्त बस ही ई-बस असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai BEST Bus Accident)

Mumbai BEST Bus Accident: बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज

प्राथमिक माहितीनुसार, बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र या अपघाताची दाखकता बसच्या नुकसानीवरून स्पष्ट होत आहे. तर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला अक्षरशः चिरडले असून ज्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. अतुल पडाळे असे या जखमी पादचाऱ्याचे नाव असल्याची माहिती आहे. परिणामी पडोळेंव साध्य जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने परिसरात धाव घेत जखमी पादचाऱ्याला उपचारासाठी दाखल केलं. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दादरमध्येही बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त ताजे असताना आता पुन्हा भांडुपमध्ये अपघाताची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उड़ली आहे. तर हा नेमका अपघात कसा झाला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

Vashi Best Bus Accident : वाशी टोल प्लाझावर बेस्ट बसच्या चालकाला अचानक फिट आला अन् बस थेट....

दुसरीकडे, सोमवारी रात्री वाशी टोल नाक्यावरून जात असताना चालकाला अचानक फिट (झटका) आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात टळला आहे.'बेस्ट' (BEST) बसच्या वाहकाने आपल्या तत्परतेने आणि समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ही घटना रात्री साडे-नऊच्या सुमारास घडली, जेव्हा वडाळा डेपोची बस क्रमांक 8230 टोल नाक्यावरून जात होती. यावेळी चालक किरण जाधव यांना अचानक फिट आली, ज्यामुळे चालत्या बसवरील नियंत्रण सुटले. मात्र वाहक किशोर गुरव यांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि इतर वाहने किंवा पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली.

Vashi Bus Accident : गाडीवरील नियंत्रण सुटलं, बस थेट वाशीटोल नाक्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली

यावर बोलताना वाशीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) रवींद्र नारोडे यांनी सांगितले की, "किरण जाधव (वय 32) असे नाव असलेला बेस्ट बसचा चालक प्रवाशांना वडाळा बस डेपोतून घणसोलीकडे घेऊन जात होता. रात्री 9.50 च्या सुमारास जाधव यांना अचानक फिट आली आणि त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस वाशी टोल नाक्यावरील रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. धडकेच्या तीव्रतेमुळे स्टिअरिंग व्हीलवर आदळल्याने चालक जाधव यांच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली. दोन प्रवाशांच्या हाताला किरकोळ ओरखडे आले. या अपघातात बसची समोरील काच (विंडशील्ड) फुटली."

वाशीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर म्हणाले, "सुदैवाने, बेस्ट बस चालकाला वाशी खाडी पुलावरून जात असताना फिट आली नाही; अन्यथा प्रवाशांनी खच्चून भरलेली बस खाडीत कोसळण्याची शक्यता होती."

इतर महत्वाच्या बातम्या 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime News: ट्रेनमध्ये छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात बांगड्या भरल्या, ओठांवर लिपस्टिक लावली; अकोला-बडनेरा रेल्वेत काय घडलं?
ट्रेनमध्ये छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात बांगड्या भरल्या, ओठांवर लिपस्टिक लावली; अकोला-बडनेरा रेल्वेत काय घडलं?
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Pune Crime Khalil Shaikh: खलील शेखने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, अटकेची शक्यता, रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?
खलील शेखने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, अटकेची शक्यता, रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?
Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: 2 तासांचा जपानी व्हिडीओ, कॉन्ट्रॅक्ट; पहिले होकार, ऐनवेळी नकार; आता तोच सिया आणि चेतनविरोधातील सर्वात महत्त्वाचा साक्षीदार
2 तासांचा जपानी व्हिडीओ, कॉन्ट्रॅक्ट; पहिले होकार, ऐनवेळी नकार; आता तोच सिया आणि चेतनविरोधातील सर्वात महत्त्वाचा साक्षीदार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Embed widget