Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Mumbai Crime Malad: मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ व्हायरल, पाण्यासाठी तडफडणाऱ्या मुलाला मित्रांनी दारु पाजली अन्... कुरार परिसरातील घटनेने खळबळ

Mumbai Crime Malad drug overdose: राज्यातील अमली पदार्थांची तस्करी आणि त्यांच्या वाढत्या सेवनाचा विषय चर्चेत असताना आता हे संकट अगदी सामान्य लोकांच्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहे आणि ते किती दाहक आहे, हे दाखवणारी घटना नुकतीच मुंबईच्या मालाड (Malad news) परिसरात घडली आहे. मालाड पूर्वेला असणाऱ्या कुरार आप्पापाडा परिसरात ड्रग्सचा ओव्हर डोस (Drugs) घेतल्यामुळे 19 वर्षाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ड्रग्जची प्रचंड नशा चढलेली किशोरवयीन मुले दिसत आहेत. हा व्हिडीओ अंगावर अक्षरश: काटा आणणारा आहे. यामध्ये दोन मुलं एका दुसऱ्या मुलाच्या हातात जबरदस्तीने ड्रग्जचे इंजेक्शन देताना दिसत आहेत. स्थानिकांच्या दाव्यानुसार, या परिसरातील अनेक लहान मुले ड्रग्जचे सेवन करतात. यापैकी एका मुलाचा ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. कुरार परिसरात ड्रग्स मिळत असल्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरला आहे. (Mumbai Crime news)
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. यानंतर रार पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. कुरार पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या दखल घेत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सर्व मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ड्रग्सचा ओव्हर डोस घेतल्यामुळे मुलाच्या मृत्यू झाला असल्याचा स्थानिकांच्या दावा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी सर्व मुलं अल्पवयीन असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे.
मयत झालेला मुलगा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन मुलांना घेऊन आप्पा पाडा येथील गार्डनमध्ये ड्रग्ज पिण्यासाठी आला होता. या तिघांपैकी दोन मुलांनी पहिल्यांदा ड्रग्सचे सेवन केले होते. कुरार पोलिसांनी या प्रकरणी एडिआर दाखल करून मयत व्यक्तीचा पीएम रिपोर्ट आल्यानंतर कशामुळे मृत्यू झाली याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करणार असल्याची माहिती दिली आहे.
Crime news: पाणी प्यायला मागितलं पण मित्रांनी दारु पाजली अन् मुलाने जीव सोडला
मालाड परिसरातील या घटनेबाबत शरद पवार गटाचे स्थानिक नगरसेवक अजितराव रावराणे यांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे. मालाड आप्पा पाडा झोपडपट्टीचा परिसर असून या परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स विक्री केली जाते. त्यामुळे येथील लहान मुलं ड्रग्जचे सेवन करतात, असे अजित रावराणे यांनी सांगितले. मालाड पूर्वेला कुरार आप्पा पाडा परिसरात शारदा बाई गोविंद पवार उद्यान आहे. याच उद्यानात ही मुले ड्रग्ज घेत होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओत चार किशोरवयीन मुलं ड्रग्ज घेताना दिसत आहेत. ड्रग्जच्या ओव्हरडोस घेतल्याने यापैकी एका मुलाची तब्येत बिघडली होती. तो आपल्या मित्रांकडून प्यायला पाणी मागत होता. मात्र, त्याच्या मित्रांनी त्याला बाटलीतून दारु पाजली. त्यामुळे या 19 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
यासंदर्भात पोलिसांकडे वारंवार स्थानिक नगरसेवक अजितराव राणे यांच्याकडून तक्रार करण्यात आली होती. पोलिसांकडून कारवाई केली जाते. यानंतर आरोपी पुन्हा कोर्टातून सुटून जातात. सुटल्यानंतर पुन्हा आरोपी मालाड झोपडपट्टी परिसरात बिनधास्त ड्रग्जची विक्री आणि सेवन करतात. आप्पा पाडा परिसर हा डोंगराळ आहे, हा भाग वनविभागाच्या अखत्यारित येतो. या डोंगरावर 28 ते 30 हजार लोकांची वस्ती आहे. या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विकले जाते.पोलीस कारवाई करायला गेले तर आरोपी जंगलात पळून जातात, अशी माहिती नगरसेवक अजित रावराणे यांनी दिली.
आणखी वाचा





















