Chhatarpur Crime News : आईनेच कुऱ्हाडीने वार करत पोटच्या मुलीला संपवल्याची (MP Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याने खळबळ माजली आहे. वडील घरी नसताना आईने संधी साधली. ही घटना घडली तेव्हा घरात आई (Mother) आणि मुलगी (Daughter) होते. महिलेचा पती कामानिमित्त गावाबाहेर गेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (MP Crime News) घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी महिलेला महिलेला अटक केली. त्याचबरोबर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


आईकडूनच पोटच्या 13 वर्षांच्या मुलीची हत्या


मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छतरपूर (Chhatarpur) जिल्ह्यातील ही काळीज पिळवटणारी घटना समोर आली आहे. एका निर्दयी आईने आपल्याच 13 वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती कामानिमित्त गावाबाहेर गेला होता. त्यामुळे आरोपी महिला आणि मुलगी घरी या दोघीच घरी होत्या. आरोपी महिला मानसिक आजाराने ग्रस्त आहे, त्यामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी महिलेला अटक सखोल तपास सुरू केला आहे.


चिमुकल्या भावासमोर बहिणीची हत्या


छतरपूरमध्ये (Chhatarpur News) एका महिलेने आपल्या 13 वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. आईने मुलीवर कुऱ्हाडीने 4 ते 5 वार केले. चिमुकल्या भावासमोर बहिणीची हत्या करण्यात आली. आईने मुलीवर कुऱ्हाडीने वार केले तेव्हा शेजारी झोपलेल्या 10 वर्षाच्या भावाने हे धक्कादाक दृश्य पाहिलं आणि तो किंचाळला. त्याने धावत जाऊन शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र, तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता.


कुऱ्हाडीने वार करत पोटच्या मुलीला संपवलं


छतरपूर जिल्ह्यातील भगवा पोलीस स्टेशन हद्दीतील पुत्रीखेरा गावातील ही घटना समोर आली आहे. मुन्ना अहिरवार यांची पत्नी ज्योती अहिरवार हिने तिची 13 वर्षांची मुलगी रुजा अहिरवार हिची निर्घृणपणे हत्या केली. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास तिची आरोपी ज्योतीने पूजावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करत वार केले. कुऱ्हाडीने चार ते पाच वार केल्याने पूजाचा जागीच मृत्यू झाला. 


महत्वाच्या इतर बातम्या :


ISI Terrorists Arrested : पुणे आयसिस प्रकरणातील तीन 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवादी अटकेत, दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला; अयोध्या राम मंदिरासह प्रमुख मंदिरं ISIS च्या निशाण्यावर