Maharashtra Jail:  महाराष्ट्रातील विविध तुरुंगात कैद्यांकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन सापडल्याने आता महाराष्ट्रात कारागृह प्रशासन (Maharashtra Prison Department) आता सतर्क झाले आहे. प्रशासनाने आता या प्रकरणी शोध मोहीम सुरू केली असून दोषीं अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करण्याची कारवाई सुरू केली आहे. कठोर सुरक्षा व्यवस्था असलेल्या कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल फोन (Mobile Phones) आढळून आल्याने या कैद्यांना कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट कोण देत आहे, याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. 


कल्याण आधारवाडी जेल आणि कोल्हापूर सेंट्रल जेल या तुरुंगात नुकतेच मोबाईल सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी  तेथील वरिष्ठ अधिकारावर कारवाई करून त्यांना निलंबित केले आहे 


कल्याण आधारवाडी जेलचे अधीक्षक अंकुश सदाफुले आणि कोल्हापूर सेंट्रल जेलचे तुरुंग अधिकारी सतीश कदम आणि म्हस्के यांना निलंबित करण्यात आलेले आहे. या दोन्हीही तुरुंगात मोबाईल फोन सापडल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आलेली आहे.  मात्र, मोबाईल फोन कुठून येतात, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 


काही दिवसापूर्वी कल्याण आदरवाडी जेलमध्ये 16 मोबाईल फोन सापडले होते. पण या प्रकरणात वरिष्ठांना माहिती दिली गेली नाही अथवा गुन्हादेखील दाखल केला नव्हता. त्यामुळेच या तुरुंगातील अधीक्षकावर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.


त्याचबरोबर कोल्हापूर जेलमध्ये सुद्धा असाच प्रकार घडवून काही मोबाईल फोन सापडले होते.  त्यासंदर्भातही गुन्हा दाखल झाला नाही  अथवा वरिष्ठांना कोणतीही माहिती दिली गेली नाही. त्यामुळेच दोन जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आली आहे. एकच मोबाईल मध्ये 22 विविध सीम कार्ड वापरले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. 


या सर्व प्रकरणानंतर कारागृह विभाग सतर्क झाला असून महाराष्ट्रातील सर्व कारागृहात विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे 


कारागृह प्रशासनांला संशय आहे की ठाणे, तळोजा, येरवडा, नागपूर आणि इतर काही कारागृहात मोबाईल फोन वापरले जातात आणि त्या निमित्ताने ही शोध मोहीम चालू केलेली आहे.



कुटुंबियांसोबत संपर्क साधण्यासाठी तुरुंगातील कैद्यांना आता कॉईन बॉक्स बंद, स्मार्ट कार्ड सुरु; कैद्यांसाठी नवीन उपक्रम



 महाराष्ट्रातील तुरुंगातील कैद्यांना आता कॉईन बॉक्स नाहीतर त्यांच्या नातेवाईकांशी स्मार्ट कार्ड फोनद्वारे संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहाने या नाविन्यपूर्ण सेवेची चाचणी घेण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक (तुरुंग आणि सुधारात्मक सेवा), अमिताभ गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास, स्मार्ट कार्ड फोन उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी कॉईन बॉक्स देण्यात आला होता. मात्र, बाजारात कॉईन बॉक्सेसची उपलब्धता नसल्याने आणि त्यांची दुरुस्तीची सोय नसल्याने ही यंत्रणा जीर्ण झाली होती. शिवाय, विविध सुविधा बंद केल्यामुळे कैदी आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील संवादात अडथळा निर्माण झाला.