1 लाख 73 हजार रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आणि गांजा जप्त
पुढे आलेल्या माहितीनुसार, अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर , अब्दुलरझाक अब्दुलरहीमान शेख, उमरफराज राजू शेख आणि एक अल्पवयीन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिरज शहरातील महात्मा गांधी चौक ते कुपवाड रस्त्यावर एका हॉटेल जवळ दोघेजण नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक पथक तयार केले. या पथकाने महात्मा गांधी चौक येथे सापळा लावला असता त्यांना दोघे संशयित चालत येताना दिसले. त्यांच्या पाठोपाठ दोघेजण दुचाकीवरून येऊन त्यांच्याकडे नशेच्या गोळ्या सुपूर्त केल्या.
चौघांवर पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 73 हजार रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आणि गांजा जप्त करण्यात आला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यातील बडे मासे नेमके कोण? याचा देखील तपास करत आहे. मात्र या घटनेने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.
आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 90 जणांची फसणूक
धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून नाशिकसह धुळ्यातील 90 जणांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करून पसारा झालेल्या संशयित वैभव पोळ याला कोकणातील श्रीवर्धनमधून गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मागील महिन्यात सरकार वाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या एक महिन्यापासून नाशिक पोलिसांकडून वैभव पोळ याचा शोध सुरू होता श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या रिसॉर्टवर शोध सुरू असताना त्याला काल पहाटे एका रिसॉर्ट मधून गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
