एक्स्प्लोर

पोलिसांची वर्दी देण्यासाठी 'अलार्म', तर बारबालांसाठी गुप्त पळवाट; मीरा रोडमधील 'केम छो' ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड

Mira Road Crime News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मीरा रोड येथून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. मीरा रोड महामार्गावरील केम छो या ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Mira Road Crime: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मीरा रोड येथून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. मीरा रोड महामार्गावरील केम छो या ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. धाडीत पोलिसांच्या छाप्याची वर्दी देण्यासाठी चक्क अलार्म आणि बारबालांना लपण्यासाठी गुप्त खोलीसह तेथून पळण्यासाठी वाट केल्याचे वास्तव समोर आलं आहे.

'त्या' ठिकाणी 11 बारबाला लपलेल्या आढळल्या

पुढे आलेल्या माहितीनुसार, मुंबई - अहमदाबाद महामार्गावर असलेल्या लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केम छो नामक हा ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने पोलिस पथकाने अचानक छापा टाकत कारवाई केली. ज्यामध्ये मेकअप रूमच्या मागील पार्टिशनलगत गुप्त दरवाजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी चावीने हे दार उघडले असता मागे अरुंद बोळ दिसून आली. त्या ठिकाणी 11 बारबाला लपलेल्या आढळल्या. तर तेथून मागच्या बाजूने पळून जाण्यासाठी वाट केलेली होती. मात्र, पोलिसांनी बाहेरून देखील नाकाबंदी केल्याने त्यांना पळून जाण्यात यश आले नाही. ऑर्केस्ट्रा बारमध्ये केलेली हि युक्ती आणि छुप्या पद्धतीने सुरु असलेलं हे कृत्य बघून सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहे. तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

भाईंदरमध्ये व्यावसायिक वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला

भाईंदर पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात व्यावसायिक वादातून तिघा मराठी युवकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे.  पाच ते सहा परप्रांतीय आरोपींनी भूषण पाटील, रुपेश पाटील आणि नितेश पाटील यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. या तिघांना तातडीने भाईंदरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ते सध्या उपचार घेत आहेत.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मराठी एकीकरण समितीने परप्रांतीय गुंडांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पोलिसांची भीतीच उरलेली नाही, परप्रांतीय गुंड खुलेआम दादागिरी करत आहेत. अशा गुंडांना तात्काळ अटक झाली नाही, तर आम्ही पुन्हा मोर्चा काढू,” असा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे. याआधी काही दिवसांपूर्वीही मराठी साठी मोर्चा काढण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर रेल्वे स्थानकावरील एका कामाचा ठेका फिर्यादींकडे आला होता, तर संबंधित परप्रांतीय आरोपींचा ठेका रद्द करण्यात आला होता. ठेका का रद्द करण्यात आला याची चौकशी करण्यासाठी आरोपी रेल्वेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात आले होते. त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या फिर्यादींवर अचानक हल्ला चढवण्यात आला. हल्लादरम्यान आरोपींनी “मराठींना येथे काम करू देणार नाही,” अशी खुलेआम धमकी दिल्याचेही आरोप होत आहे. या गंभीर प्रकारानंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Fire Accident: दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vasai Judge Shocking Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
Mumbai Water Cut: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
Eknath Shinde Thane Fire: ठाण्यातील इमारतीला भीषण आग लागली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन आत शिरले, फायरब्रिगेडच्या जवानांना विचारलं, 'तो पोरगा यंग आहे ना?'
ठाण्यातील इमारतीला भीषण आग लागली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन आत शिरले, फायरब्रिगेडच्या जवानांना विचारलं, 'तो पोरगा यंग आहे ना?'
Dharashiv Fire Incident News: धाराशिवमध्ये घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा गुदमरुन मृत्यू, किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारं कुटुंब मृत्युच्या खाईत
धाराशिवमध्ये घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा गुदमरुन मृत्यू, किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारं कुटुंब मृत्युच्या खाईत
Embed widget