Mira Road Crime News : मिरा रोडमधूनएकधक्कादायकबातमीसमोरआलीआहे. परिसरातील बेव्हर्ली पार्कमधील ए.एन.के. लक्झरी सलून अँड स्पा येथे पोलिसांनी छापा टाकून कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईदरम्यान स्पामधून पाच तरुणींची सुटका करण्यात आली असून, स्पाच्या आड देहव्यापार चालवल्याप्रकरणी दोन आरोपींना (Mira-Bhayandar) अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या स्पावर ही कारवाई करण्यात आली तो स्पा मीरा-भाईंदर शहरातील एका नामांकित शाळेसमोरच असल्याने शाळेच्या परिसरात अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. (Mira-Bhayandar Crime News)

Continues below advertisement

दरम्यान, मिरा रोड पोलिसांनी आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून स्पाचे परवाने, कागदपत्रे आणि इतर कायदेशीर दस्तऐवजांचीही तपासणी सुरू केली आहे. हा बेकायदेशीर व्यवसाय नेमका किती दिवसांपासून सुरू होता आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Panvel Crime News :मद्यधुंद वाहन चालक तरुणाकडून वाहतूक पोलिसांना मारहाण, नेमकंप्रकरणकाय?

सायन पनवेल महामार्गावर मानखुर्द जंक्शन जवळ एक मद्यधुंद वाहन चालक तरुणाने वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुधीर देवदास लोखंडे या 35 वर्षीय आरोपी तरुणाला मानखुर्द पोलिसनी अटक केली आहे. सुधीर लोखंडे नशेत मानखुर्द जंक्शन जवळ इतर वाहनचालकांशी भांडण करीत होता. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहतूक पोलीस अजितनाथ शिवाजी घनवट हे त्याला बाजूला घेण्यास गेले असता त्याने जोरजोरात 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली आणि पोलिसांशी झटापट सुरू केली. त्यामुळे या ठिकाणी आणखी पोलीस दाखल झाले. त्याला अडवण्याचा प्रयत्न केले असता त्याने पोलिसांना चावा ही घेतला आणि त्यांचे कपडे फाडले. त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. अखेर मानखुर्द पोलिसानी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Continues below advertisement

Thnae Accident : ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा अपघात

ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा अपघात झालाआहे. ठाण्यातील कापूरबावडी पुलाजवळ हाअपघातझालाआहे. चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मल्टी एक्सेलर ट्रकने रस्त्याच्या मधील दुभाजकावर जाऊन धडक दिलीआहे. सुदैवाने चालक यात बचावला आहे. दुभाजकावर अडकलेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या