Milind More Virar Seven Sea Resort विरार: विरारच्या अर्नाळा येथील सेवन सी रिसॉर्टमधील (Virar Seven Sea Resort) कर्मचारी आणि रिक्षाचालकांच्या मारामारीत ठाण्याचे माजी परिवहन समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे याचं मारहाणीनंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. हाणामारीची आणि हृदयविकाराचा झटका आल्याची संपूर्ण घटना रिसॉर्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाली आहे. या घटनेनंतर सेवन सी रिसॉर्टवर प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आली.
सदर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेत अनधिकृत असलेल्या सेवन सी रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर सेवन सी रिसॉर्टवरती तोडक कारवाहीचा बडगा उगारला. हे रिसॉर्ट पूर्णपणे भुईसपाट करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता ही कारवाई सुरु करण्यात आली होती ते मंगळवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. यावेळी पालिकेचे अतिरीक्त आयुक्त आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या इतिहासांत प्रथमच साडे-पंधरा तास प्रशासनाकडून तोडक कारवाई सुरु होती.
10 अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल-
घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांची पोलीस उपायुक्तांशी फोनद्वारे चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांना फोन करून संबधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत नवीन कायद्या भारतीय दंड संहिता 2023 ते कलम 105, 281, 74, 188(1) (2), 191(2), 118(2), 352, 351 (2) प्रमाणे अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 महिला आणि 8 ते 10 अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.
नेमकं काय घडलं?
सेवन सी समोरील रिक्षा बाजूला करण्याच्या कारणावरुन झालेल्या वादावादित ठाण्यातील कुटुंबियांना 10 ते 15 जणांनी बेदम मारहाण केली. यामध्ये महिलांना देखील मारण्यात आले. या घटनेत ठाण्याचे माजी परिवहन समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचं मारहाणीनंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. तसेच दोघं गंभीर जखमी झाले.
मिलिंद अचानक कोसळला-
विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील सेवेन सी रिसॉटमध्ये काल रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. रविवारची पिकनिक बनविण्यासाठी मयत मिलिंद मोरे आपल्या कुटुंबातील 15 ते 20 जणांसोबत विरारच्या अर्नाळा सेवन सी रिसॉर्टमध्ये पिकनिकसाठी आले होते. दिवसभर मज्जा, मस्ती करुन घरी परतत असताना रिसॉटच्या गेटमध्ये एका रिक्षाचा धक्का लागून त्यांची भांडणं झाली होती. यात मिलिंदला आणि इतर दोघांनाही मारहाण झाली होती. यात बातचीत सुरु असताना मिलिंद अचानक चक्कर येवून कोसळला, त्याला तात्काळ नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं.