Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणी (NEET Exam Paper Leak) पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधे जाऊन तपासणी केली. मनीषा मांढरे (Manisha Mandhare) याच मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राध्यापिका म्हणून काम पाहात होती. यामुळे मॉडर्न महाविद्यालयातील मनीषा मांढरे यांच्या कपाट, लॉकर, डेस्क या सगळ्याची सीबीआयने तपासणी केलीय. तसेच मनीषा मांढरेचे कागदपत्र देखील चेक केले. त्याचबरोबर मॉडर्न महाविद्यालयातील अधिकाऱ्यांकडे देखील चौकशी करण्यात आली आहे. मनीषा मांढरे याचं मॉडर्न महाविद्यालयातील नियुक्तीपत्र, त्यांची NTA मध्ये झालेली नियुक्ती हे सगळं सीबीआयने तपासलं. सीबीआयने पुणे पोलिसांकडे या कामासठी मनुष्यबळ पुरवण्याची मागणी केली होती. काल आणि आज दिवसभर सीबीआय वेगवेगळ्या ठिकाणी झाडाझडती घेत आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान, मनीषा मांढरेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीषा मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचणी येत आहेत. मनीषा मांढरेची स्वत:ची स्मरणशक्ती चांगली होती. त्यामुळे याच स्मरणशक्तीचा मनीषा मांढरेने उपयोग केला. मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ होते. मनीषा मांढरेने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. मनीषा मांढरेनेच्या या ट्रिकने सीबीआयही च्रकावली. दरम्यान, नीट पेपेरफुटीतील अन्य आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मनीषा मांढरेचं नाव घेतलं आहे. त्यानंतर सीबीआयने मनीषा मांढरेला अटक केली होती. मनीषा मांढरेविरोधात अन्य कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता. (Manisha Mandhare NEET Exam Paper Leak)
मनीषा मांढरेवर निलंबनाची कारवाई- (Manisha Mandhare NEET Exam Paper Leak)
नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून मनीषा मांढरेच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या प्रशासकीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मनीषा मांढरेचा नीट पेपरफुटीमध्ये हात असल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मनीषा मांढरे हिचा नीट पेपरफुटीमध्ये हात असल्याचं समोर आल्यानंतर ती ज्या ठिकाणी प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती त्या मॉडर्न महाविद्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मनीषा मांढरे हिच्या निलंबनाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर अखेर मनीषा मांढरेच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. मनीषा मांढरे ही या महाविद्यालयात प्राणीशास्त्राची प्राध्यापिका होती.
नीटच्या पेपरफुटीची मोडस ऑपरेंडी, काय काय घडलं? (NEET Exam 2026 Paper Leak)
नीटच्या पेपर फुटीचा कट शिवराज मोटेगावकरने (Shivraj Motegaonkar) त्याच्या साथीदारांना हाताशी धरुन अतिशय सुनियोजितपणे आखल्याचं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. त्यासाठी मोटेगावकरने सर्वात आधी त्याच्या क्लासमधे काम करणाऱ्या पीव्ही कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करणार्या पॅनलवर वर्णी लावून घेतली. सोबत मनीषा मांढरे (Manisha Mandhare) हीची देखील NTA च्या पॅनलवर वर्णी लावण्यात आली. कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि त्या मोटेगावकरपर्यंत पोहोच करणार अशी सोय करण्यात आली. वर्षानुवर्षे अध्यापनाचे काम केल्याने पीव्ही कुलकर्णीने केमिस्ट्रीच्या तर मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तोंडपाठ केले. NTA मध्ये प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी त्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न तोंडपाठ केले. त्यानंतर ते हाताने लिहून काढून मोटेगावकरला पाठवले. मोटेगावकरने ते पीडीएफच्या स्वरुपात स्वत:च्या मोबाईलमधे सेव्ह करुन ठेवले आणि पुढे पैशांच्या बदल्यात त्यांची विक्री केली. 3 मे रोजी परिक्षा पार पडल्यावर मोटेगावकरने मोबाईलमधून ते डिलीट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीबीआयने मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला आणि मोटेगावकरला अटक झाली.
