Mangesh Kalokhe Death Case Khopoli: खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे (Mangesh Kalokhe) यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून मंगेश काळोखे यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झालंय. ज्यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. त्यांना  रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नाही. मात्र त्याबाबत तपास सुरू असून तो अंतिम टप्प्यात असल्याचं पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय? (Mangesh Kalokhe Death Case)

मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक होते. 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनुसार, काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना दिवसाढवळ्या या हत्येच्या घटनेने खोपोली शहर हादरले. 

भयानक हल्ल्यात काळोखेंचा जागेवरच मृत्यू- (Mangesh Kalokhe Death Case Khopoli)

खोपोलीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी सकाळी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मंगेश काळोखे हे खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. शहरातील जया बार समोर 5 जणांनी काळोखे यांचा पाठलाग करून हल्ला केला. त्यांच्यावर तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले होते. या भयानक हल्ल्यात काळोखेंचा जागेवरच मृत्यू झाला. मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांच्यासह आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Mangesh Kalokhe murder: 'आम्हाला बाबांचा चेहराही दाखवला नाही,ते कापडातच...' मंगेश काळोखेंच्या लेकींचा आक्रोश, त्या घटनेबाबत पहिल्यांदा बोलल्या, खोपोलीत त्यादिवशी नेमकं काय घडलं?