एक्स्प्लोर

Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात

Beed Crime: कारवाईचा संशय आल्याने अधिकाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र, लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

Beed Crime: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत शेतीच्या फेरफाराची नोंद करून देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या एका मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध बीड एसीबीने कारवाई केली आहे. सतीश विठ्ठलराव भुसेवाड असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगावात सेवेत होता. तक्रारदार यांच्या शेतीच्या फेरफार नोंदीची कार्यवाही करण्यासाठी सतीशने तब्बल एक लाख रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात तक्रारदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने तातडीने पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. 

संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही, पण

दरम्यान, कारवाईचा संशय आल्याने अधिकाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र, लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. लाच स्वीकारण्यासाठी मागणी केल्याप्रकरणी सतीश भुसेवाडविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाचा अधिकचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक दीपकाकडून केला जात आहे. 

चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणे महागात

दुसरीकडे, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला 'ना हरकत दाखला' देण्याच्या मोबदल्यात 1200 रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले. पांडुरंग वासुदेव नाटेकर असे त्याचे नाव आहे. कुडाळ येथे 'पदमगड ज्वेलर्स' नावाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नगरपंचायतीकडे ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केला होता. हा दाखला मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकरने 1200 रुपये किंमतीची नवीन खडा असलेली चांदीची अंगठी लाच म्हणून मागितली होती. 

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीचे पथक येताच संशयित नाटेकर यांनी स्वतःला वाचवण्यासाठी ती अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तू हाताळताना लावली जाणारी अँथ्रोसिन पावडर नाटेकरच्या हातावर स्पष्ट दिसून आल्याने, पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयित पांडुरंग नाटेकर यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधारणा 2018) चे कलम 7 आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 238 (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
Advertisement

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget