Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर शहरातील उद्धवराव पाटील चौकात जुन्या वादाचा राग काढत दोन तरुणांनी एका मेकअप आर्टिस्टवर रस्त्यातच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून लहानसहान वादातून मारहाणीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. (Crime news)

Continues below advertisement

नेमकं काय घडलं?

ही घटना 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी साधारण पाचच्या सुमारास घडली. तक्रारदार संजित संजय थोरात (वय 24, रा. भारतमातानगर, एन-12) हे व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहेत. त्या दिवशी थोरात हे आपल्या दुचाकीचे पंक्चर काढण्यासाठी उद्धवराव पाटील चौकात गेले होते. त्याचवेळी शेखर पोतदार (वय 34, रा. बी सेक्टर, टीव्ही सेंटर) व प्रज्वल राजपूत (वय 25) हे दोघे तेथे आले. जुन्या भांडणाचा मुद्दा काढून त्यांनी थोरात यांना अडवले व शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे संजित थोरात यांनी प्रतिकार करत “मला का मारत आहात?” असा जाब विचारला. त्यावर संतापलेल्या शेखर पोतदार यांनी थोरात यांना धमकी दिली की, “तू पोलिसांत तक्रार केलीस तर तुला बघून घेतो.” एवढ्यावर न थांबता पोतदार यांनी हातातील कडे काढून थोरात यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. यामुळे थोरात गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी प्रज्वल राजपूत यांनी हातातील संजित थोरात यांच्या डोक्यावर आणखी एक प्राणघातक हल्ला केला. सलग वारांमुळे थोरात यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Continues below advertisement

साध्या वादातून थेट प्राणघातक हल्ल्यापर्यंत

या घटनेनंतर थोरात यांनी थेट बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी शेखर पोतदार आणि प्रज्वल राजपूत या दोघांविरुद्ध मारहाण, जीवघेणा हल्ला व धमकावणे यासह भारतीय दंड विधानातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून साध्या वादातून थेट प्राणघातक हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींनी आधीही भांडणाचा मुद्दा उपस्थित करून धमकावले असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

हेही वाचा 

Jalgaon Crime : बड्या अधिकाऱ्याकडून महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी, केबिनमध्ये बोलावलं अन्...; जळगावात खळबळ