पुणे: शिक्षणाची पंढरी आणि सांस्कृतिक वारसा जपणारी ऐतिहासिक नगरी अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला आहे. पुण्यासह (Pune) परिसरातील ग्रामीण भागात गुंठामंत्री व जमिनीवरुन वाद होत असल्याचे सातत्याने पुढे आलं आहे. तर, येथील बिल्डर लॉबीवरुनही गुन्हेगारीच्या घटना घडताना पाहायला मिळते. मात्र, दिवसाढवळ्या पुण्यातील सराफ दुकानावर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडल्याने पुणे शहरात खबळ उडाली आहे. दुचाकीवरुन आलेल्या पाच-सात युवकांच्या ग्रुपने थेट सराफ दुकानात घुसून हाती बंदुक घेऊन सराफ दुकान लुटले आहे. पोलिसांनी (Police) तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
पुण्यात्तील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या महंमदवाडी रस्त्यावर सात जणांच्या अनोळखी टोळक्याने एका ज्वेलर्स वर टाकला दरोडा टाकून तब्बल 300 ते 400 ग्रॅम सोने नेले लुटून नेल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या टोळक्यानं बीजीएफ ज्वेलर्सवर दरोडा टाकत येथील सोने लुटून नेले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. महमदवाडी रस्त्यावर असलेल्या वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अशाप्रकारे दिवसाढवळ्या दरोड्याची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध सुरू केला असून संबंधित आरोपी कुठल्या गँगचे किंवा ग्रुपचे आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. मात्र, हाती पिस्तुल घेऊन सराफाचे दुकान लुटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, याच आठवड्यात पुण्यात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान झाले असून पोलीस यंत्रणा मतदानाच्या तणावातून काही प्रमाणात मुक्त झाली आहे. त्यातच, गुन्हेगारीने डोकं वर काढल्याने पोलिसांपुढे पुण्यातील गुन्हेगारी विश्वाचं आव्हान आहे.