एक्स्प्लोर

Mahesh Gaikwad : गणपत शेठच्या नादाला लागू नकोस, तुझा बाबा सिद्दिकी होईल; महेश गायकवाडांना धमकीचे पत्र

Mahesh Gaikwad : महेश गायकवाड हे शिंदे गटाचे कल्याणचे माजी शहरप्रमुख असून त्यांना या आधीही धमकीचे पत्र आले होते. भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांनी त्यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता.

ठाणे : गणपत गायकवाड आणि वैभग गायकवाडच्या नादाला लागू नकोस नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी होईल असे धमकीचे पत्र कल्याणच्या महेश गायकवाडांना आलं आहे. हे पत्र जेलमधून भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांनीच पाठवलं असल्याचा महेश गायकवाडांचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. गणपत गायकवाडांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये महेश गायकवाडांवर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्या प्रकरणात गणपत गायकवाड हे तुरुंगात आहेत. 

महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे माजी शहराध्यक्ष आहेत. विधानसभेच्या वेळी त्यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. या आधीही त्यांना धमकी मिळाली होती. 

गणपत गायकडांनी धमकी दिल्याचा आरोप

अंबरनाथ मधील आनंद नगर येथे सामूहिक विवाह समारंभासाठी महेश गायकवाड गेले असता त्यांच्या हातामध्ये अज्ञात व्यक्तीने एक लिफाफा (कागदी पाकीट) दिले. नेहमी प्रमाणे नागरिक आपली समस्या महेश गायकवाड यांना निवेदनाद्वारे देत असल्याने त्यांनी या लिफाफा पाहिला नाही. शनिवारी त्यांनी हा लिफाफा पाहिला असता त्यात धमकीचे पत्र असल्याचं समोर आलं. त्यानंतर महेश गायकवाड यांनी अंबरनाथमधील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

हे पत्र जेलमधून पाठवण्यात आले असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला. हा गंभीर प्रकार असताना पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या पत्राचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पत्रातील मजकूर काय? 

M G तू गणपत शेठ वैभव के पिछे मत लग. नहीं तो तेरा बाबा सिद्दीकी होगा 


Mahesh Gaikwad : गणपत शेठच्या नादाला लागू नकोस, तुझा बाबा सिद्दिकी होईल; महेश गायकवाडांना धमकीचे पत्र

गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार 

भाजपचे कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे त्यावेळचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता. हे प्रकरण 2 फेब्रुवारी 2024 रोजी घडलं होतं.  

जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड  (Ganpat Gaikwad) यांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला. या दोघांच्या दरम्यान एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. 2 फेब्रुवारीला हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दोघेही आले होते. यादरम्यान, गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला.  

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime : शेतीच्या वादात पुतण्यानं संतापाचं टोक गाठलं; काका-काकूंचेच अश्लील व्हिडिओ केले व्हायरल; आरोपीची गावातून काढली धिंड
शेतीच्या वादात पुतण्यानं संतापाचं टोक गाठलं; काका-काकूंचेच अश्लील व्हिडिओ केले व्हायरल; आरोपीची गावातून काढली धिंड, छत्रपती संभाजीनगरचं प्रकरण चर्चेत!
Laxman Hake: मोठी बातमी! सोलापुरात लक्ष्मण हाकेंसोबत अज्ञात तरुणांची झटापट झाल्याचा आरोप; मोहोळमध्ये गुन्हा दाखल, दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी! सोलापुरात लक्ष्मण हाकेंसोबत अज्ञात तरुणांची झटापट झाल्याचा आरोप; मोहोळमध्ये गुन्हा दाखल, दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
Embed widget